India Fights Corona : “श्री फाउंडेशन” तर्फे पोलिसांना सॅनिटायझर, टिसू व मास्कचे वाटप

India Fights Corona :

लोकमराठी न्यूज नेटवर्क

पिंपरी चिंचवड : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून सॅनिटायझर बाजारातून गायब झाले आहे. तर अनेक ठिकाणी सॅनिटायझर आणि मास्कचा काळाबाजार सुरु आहे. असे आढळून आल्याने “श्री फाउंडेशन” च्या वतीने वाकड पोलिस ठाणे व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील पासपोर्ट विभाग येथे 70 पोलिस कर्मचारींना नुकतेच सॅनिटायझर, टिसू व मास्कचे मोफत वाटप करण्यात आले.

“कोरोना” चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी किमान 20 सेकंद साबणाने हात धुवावेत व बाहेरुन आल्यानंतर हाताला सॅनिटायझर लावावे. असे श्री फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष सुशांत पांडे यांनी सांगितले.

तसेच यावेळी पासपोर्ट विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील पिंजण यांनी कोरोना विषाणू संसर्ग होऊ नये, यासाठी काय काळजी घ्यावी, याची माहिती दिली. सर्दी, ताप, खोकला तसेच श्वसनाचा त्रास होत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा, असेही आवाहन केले. यावेळी पोलीस निरीक्षक सुनील पिंजण व कर्मचारी उपस्थित होते.

India Fights Corona :
वाकड पोलिस ठाणे

त्याचबरोबर “कोरोना”वर नियंत्रण मिळविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहानानुसार काही तातडीच्या कामाशिवाय बाहेर पडु नये, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वाकड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर सांगितले.

त्यावेळी वरिष्ठ निरीक्षक विवेक मुगळीकर, सह-पोलीस निरीक्षक हरिश माने, पोलीस उपनिरीक्षक विकास मडके, उपनिरीक्षक रविंद्र मुदळ, सुदर्शन कापरे, व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या आयोजनात फाउंडेशनचे सुशांत पांडे, संदीप शिंदे, संजय नागवे, दादाराव आढाव आदींनी सहकार्य केले.