एस. एम. जोशी कॉलेजच्या प्राचार्यपदी डॉ. चंद्रकांत खिलारे

एस. एम. जोशी कॉलेजच्या प्राचार्यपदी डॉ. चंद्रकांत खिलारे

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नामांकित एस. एम. जोशी कॉलेज हडपसर येथे डॉ. चंद्रकांत खिलारे हे प्राचार्य म्हणून रुजू झाले आहेत. ते शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विज्ञान शाखेचे अधिष्ठाता, सिनेट सदस्य, आणि अकॅडमीक कौन्सिलचे सदस्य होते. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बॉटनी अभ्यास मंडळावर त्यांनी काम पाहिले आहे.

दहिवडी कॉलेज दहिवडी, राजर्षी शाहू कॉलेज कोल्हापूर, बळवंत कॉलेज विटा येथे प्राचार्य म्हणून त्यांची कारकीर्द उत्तम ठरली आहे. संशोधनाची दृष्टी असणारे ते संशोधक अभ्यासक व उत्तम प्रशासक आहेत. यूजीसीच्या माध्यमातून त्यांनी अनेक मेजर व मायनर रिसर्च प्रोजेक्ट त्यांनी पूर्ण केले आहेत. ते पीएचडीचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक विद्यार्थी पीएच.डी. झाले आहेत.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये ४० हून अधिक संशोधनपर लेख त्यांचे प्रसिद्ध झाले आहेत. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी तज्ञ व्यक्ती म्हणून भाग घेतला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या मानाच्या लाइफ मेंबर या पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौंशीलचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले असून शिवाजी विद्यापीठ बॉटनी असोसिएशनचे ते उपाध्यक्ष आहेत.

रयत शिक्षण संस्थेचे, उपाध्यक्ष आमदार चेतन (दादा) तुपे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप आबा तुपे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अशोक आप्पा तुपे, उपप्राचार्य डॉ. महादेव जरे, प्राध्यापकवर्ग व सेवक इत्यादींनी प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांचे स्वागत केले.