पिंपरी : दुर्गा ब्रिगेड संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीने येथे क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दुर्गा भोर यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला.
त्याप्रसंगी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर, पिंपरी-चिंचवड शहर महिला उपाध्यक्ष रूपाली भडाळे, शिक्षण विभागाच्या साधना दातीर पाटील, उपाध्यक्ष श्रीमती नलिनी पाठक, मीनाक्षी आव्हाड, सहसचिव जागृती धुमाळ, संजीवनी पुराणिक प्रीतम शहा, नितीन सोनवणे, नितेश जगताप, राजीव धुरंधर, रवींद्रकुमार भडाळे, मिथुन पवार, इशांत आव्हाड, आकाश वाडेकर, देवा भालके व अनेक दुर्गा ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी दुर्गा बोलताना म्हणाल्या, समाजामध्ये महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. अठराव्या शतकात स्त्रियांचे क्षेत्र फक्त चूल आणि मुल होते, ते बदलण्यात सावित्रीबाई फुले यांचा मोठा हातभार आहे. सर्व स्त्री वर्गाने त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन पुढे यावे आणि सर्वच क्षेत्रांमध्ये आपला ठसा उठवावा आजही ३० टक्के टक्के महिला शिक्षणापासून वंचित आहेत आणि अनेक स्त्रियांना होणाऱ्या हुंडाबळी सारख्या छळापासून मुक्तता देण्यासाठी तसेच उद्योग व्यवसायामध्ये हिरारीने सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहावे. हीच खरी आदरांजली म्हणावी लागेल, यावेळी फोरमचे अध्यक्ष अभय भोर रूपाली पाडाळे, साधना दातीर पाटील, राजू धुरंधर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.