चिंचवड व काळेवाडीतील युवा कार्यकर्त्यांचा आम आदमी पक्षामध्ये प्रवेश

चिंचवड व काळेवाडीतील युवा कार्यकर्त्यांचा आम आदमी पक्षामध्ये प्रवेश

पिंपरी : दिल्ली, पंजाब यशा नंतर पिंपरी चिंचवडमध्ये ही आम आदमी पार्टीचे काम जोरात सुरू आहे. सोशल मीडियासह, आम आदमी पार्टीमध्ये युवा कार्यकर्ते उस्फूर्त प्रवेश करत आहेत. आज चिंचवड व काळेवाडी भागातील काही युवा कार्यकर्ते अजय सांगळे, अमेय बलकवडे, चिन्मय बाग, ऋतुज भंडारे, भूषण शेलार व अकबर शेख, रवींद्र खेडेकर आदी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. हा प्रवेश आप पिंपरी चिंचवड संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट, आप डॉक्टर विंग अध्यक्ष डॉ. अमर डोंगरे, आप प्रवक्ते प्रकाश हगवणे यांच्या उपस्थित करण्यात आला

यावेळी आप प्रवक्ते प्रकाश हगवणे यांनी बोलताना म्हटले, आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या निवडणुकीत सर्व जागा ताकतीनीशी लढवणार आहे. या निवडणुकीमध्ये युवकांनाही मोठ्या प्रमाणावर संधी देण्यात येणार आहे. असे त्यांनी सांगितले. लवकरच गुजरातमध्ये आम आदमी पार्टी विजय संपादन करेल, असे डॉक्टर अमर डोंगरे यांनी म्हटले.