चिंचवड : जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री फत्तेचंद जैन विद्यालयात कोविड १९ च्या काळात दहावीसाठी ऑनलाइन, ऑफलाइन या रस्सीखेचमधे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सखोल मार्गदर्शन मिळावे, या हेतूने तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
संस्थेचे मानद सचिव राजेंद्रकुमार मुथा, सहासचिव प्रा. अनिलकुमार कांकरिया यांच्या प्रेरणेने तसेच प्रशालेच्या प्राचार्या सुनिता नवले, उपमुख्याध्यापिका मनीषा जैन परिवेक्षक श्री सुभाष देवकाते सर पाचवी ते सातवी विभाग प्रमुख संतोष शिरसाट सर यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ञ मार्गदर्शकांचे इंग्रजीसाठी स्वाती नेवाळे, गणितासाठी संजीव वाखारे, विज्ञानासाठी कपिल राऊतमारे या विषय शिक्षकांचे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामध्ये परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. कोविड १९ चे नियम पाळून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी दहावीला शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात तीन दिवसीय व्याख्यानमाला पार पडली. यावेळी विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात व जोशपूर्ण होता.