विश्वासघात करत मित्राच्या आजीचे सोन्याचे दागिने लंपास

विश्वासघात करत मित्राच्या आजीचे सोन्याचे दागिने लंपास

औरंगाबाद : सततचे जाणे येणे करण्याऱ्या तरुणाने चक्क आपल्या मित्राचा विश्वासघात करत मित्राच्या आजीचे सोन्याचे दागिने लंपास केले. औरंगाबाद मधील छावणी परिसरात ही घटना घडली असून पोलसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेल्या शमा नियाज म्हणून या आजी आपल्या मुला, नातू आणि सुनेसह पडेगावातील अन्सार कालोनीत राहतात. यांचे किराणामालचे दुकान आहे. त्यांनी आपले पैसे कपाटात ठेवले होते. ६ ऑक्टोबर रोजी कपाटातून ठेवलेली काही रक्कम त्यांना दिसली नाही. त्यांनी शोधाशोध करताना त्यांना कपाटातील पिशवीमधून सोन्याच्या बांगड्या, गंठण कानातले, आणि सोन्याची अंगठी नसल्याचे लक्षात आले.

त्यांनी ताबडतोब घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यांनी चौकशी करताना त्यांच्याकडे येजा करणाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवले. त्यात नातवाचा मित्र आफताब सतत ये जा करत असल्याचे आढळले. पोलिसांनी आफताबची चौकशी केली असताना त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे पोलिसांना त्याचावर संशय आला आणि त्यांनी त्याच्या बदललेल्या राहणीची चौकशी केली असताना त्याने आपला गुन्हा कबुल केला.

त्याने यापूर्वी देखील मित्राच्या आजीच्या घरात चोरी केल्याचे सांगितले, आपण केलेले कृत्य कोणाला कळाले नाही, या मुळे त्याचा आत्मविश्वास वाढत गेला आणि त्याची चोरी करण्याची सवय वाढली. त्याने सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केले. त्याने हे दागिने एका सराफच्या दुकानात एका महिलेच्या मदतीने विकल्याचे सांगितले.

त्याने हे शेअर बाजारात पैसे गुंतवण्यासाठी केल्याचे सांगितले. त्याला शेअरबाजाराचा नाद लागला आहे. आफताब हा सुशिक्षित असून सध्या तो बंगळुरू मधून फार्मेसीचे शिक्षण घेत आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

Actions

Selected media actions