लोकमराठी न्यूज नेटवर्क
औंध : आज १३७ कोटी लोकसंख्येचा तरुण भारत देश आहे. ही लोकसंख्या उत्पादनक्षम झाली तरच भारत महासत्ता बनू शकेल. आजच्या लोकसंख्येला योग्य दिशा देणे व बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे ही आजची खरी आव्हाने आहेत. युवकांच्या हाताला जर काम मिळाले नाही. तर भारत देशाचे महासत्ता होण्याचे स्वप्न अपुरे राहू शकते. त्यामुळे तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी शासन व्यवस्थेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे मत डॉ. जे. एस. पाटील यांनी येथे व्यक्त केले.
येथील रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, नियोजन व विकास विभाग गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन दिनांक २७ व २८ फेब्रुवारी २०२० रोजी “भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने आणि संधी” या विषयावर करण्यात आले होते. चर्चासत्राचे उद्धाटन डॉ. जे. एस. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
या चर्चासत्रासाठी डॉ. आर.एस. देशपांडे, डॉ.जयंत पाटील, डॉ.विलास आढाव, डॉ.एस.बी. आकाश, डॉ.एच.एच.भारदी, डॉ.पी.एस.कांबळे, प्रा.अझीम अझरुद्दीन, डॉ.मकरंद चिकोडकर, डॉ.प्रविण जाधव, तसेच महाराष्ट्राबरोबरच महाराष्ट्राबाहेरील विविध राज्यातील संशोधक अभ्यासक बहुसंख्येने उपस्थित होते.
डॉ. जे. एस. पाटील म्हणाले की, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शैक्षणिक क्रांतीच्या माध्यमातून सामाजिक आणि राष्ट्र उभारणीचे कार्य केले. आज भारत देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर लोकसंख्या वाढ, आरोग्य व पाणीपुरवठा या मुख्य समस्या आहेत. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर देखील आपण शेतीला व लोकांना पुरेसा पाणीपुरवठा करू शकलेलो नाही. तसेच शिक्षण आणि आरोग्य यावर शासनाने जास्तीत जास्त आर्थिक खर्च करायला पाहिजे. शहरीकरणामुळे आरोग्य, निवारा व प्रदूषणाच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यावर उपाययोजना म्हणून ‘स्मार्ट सिटी’ सारखी योजना शासन राबवित आहे. शेतीचे नंदनवन करण्यासाठी शासनाने पाणी प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. सर्व धरणे व नद्या एकमेकांना जोडने गरजेचे आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सेवाक्षेत्र वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
- ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयाने लावली महापुरुषांच्या प्रतिमेला “आचारसंहीता”
- Tamil Nadu Floods : बंगालच्या उपसागरावरील दबावामुळे तामिळनाडूत मुसळधार पाऊस
- KARJAT : कर्जतमध्ये वाय.के. हॉटेलचे उद्घाटन
- ‘लाडकी बहीण योजने’साठी पुन्हा मुदतवाढ; आता या तारखेपर्यंत अर्ज करता येणार…
- PIMPRI CHINCHWAD : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न ; ०५ जणांना अटक
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे म्हणाले की, भारतातील १३८ कोटी लोकसंख्या ही भारताची खरी ताकत आहे. जर प्रत्येक हाताला काम मिळाले. तर डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे भारत महासत्ता होण्याचे स्वप्न साकार होईल. बेरोजगारी, शिक्षण, शहरीकरण व शेती या प्रश्नांवर शासनाने लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या चर्चासत्राच्या निमित्ताने “भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने आणि संधी” या विषयावर विचारमंथन होऊन, यामधून भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील समस्या सुटण्यास मदत होईल. असे मत व्यक्त केले.
प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. नलिनी पाचर्णे यांनी तर आभार प्रा. कुशल पाखले यांनी केले. पाहुण्यांची ओळख डॉ.सुहास निंबाळकर, प्रा.एकनाथ झावरे व प्रा.बी.एस.पाटील यांनी केली. तर सूत्रसंचालन डॉ.सविता पाटील, प्रा.सायली गोसावी यांनी केले.