ऑईल गळतीमुळे जखमी झालेल्या दुचाकीस्वारांवर थेरगाव सोशल फाऊंडेशनमुळे तात्काळ उपचार

ऑईल गळतीमुळे जखमी झालेल्या दुचाकीस्वारांवर थेरगाव सोशल फाऊंडेशनमुळे तात्काळ उपचार

चिंचवड, ता ८ : डांगे चौकातील ग्रेडसेपरेटर रस्त्यावर ॲाईल गळती झाल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून जखमी झाले. या जखमींवर थेरगाव सोशल फाऊंडेशनच्या (TSF) सदस्यांनी प्राथमिक उपचारावर करून त्यांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. तसेच अग्निशमन दलाच्या वतीने रस्त्यावरील ऑईल साफ केले. ही घटना शुक्रवारी (ता. ८) सकाळी अकराच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ११ च्या सुमारास (Thergaon Social Foundation) टीएसएफकडे बरेच कॅाल आले की, ग्रेडसेपरेटरमधे ॲाईल गळती होऊन ॲक्सिडेंट होत आहेत. लगेचच टीसीएफचे सदस्य घटनास्थळी पोचले व फायर ब्रिगेडला वर्दी दिली. तोपर्यत टीसीएफ सदस्यांनी वाहतुकीचे नियोजन सुरु केले. या ॲाईल गळती मध्ये १५ ते २० पेक्षा जास्त दुचाकीस्वार घसरुन जखमी झाले. त्यांना प्राथमिक उपचार केले तर काहींना दवाखान्यात दाखल केले.

ऑईल गळतीमुळे जखमी झालेल्या दुचाकीस्वारांवर थेरगाव सोशल फाऊंडेशनमुळे तात्काळ उपचार

दरम्यान, अग्निशामक दलाच्या गाडी घटनास्थळी दाखल होऊन रस्ता धुऊन पुर्वरत केला. यामध्ये अनेक नागरीकांनीही मदत केली. तसेच यावेळी टीसीएफचे अनिकेत प्रभु, चेतन पंडीत, शंतनु तेलंग यांनी मोलाचे सहकार्य केले.