नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यापीठातील हिंसाचारामुळे आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या ठाकलेल्या दिल्ली पोलिसांनी आज अखेर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. या प्रकरणी नऊ संशयितांची ओळख पटविताना त्यांनी “जेएनयूएसयू’ची अध्यक्षा आईशी घोषवर हिंसाचाराचा ठपका आहे.
दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी संशयितांची सीसीटीव्ही छायाचित्रे माध्यमांसमोर मांडली. यामध्ये “जेएनयूएसयू’ची अध्यक्षा आईशी घोष हिच्यासह चुनचुन कुमार, पंकज मिश्रा, वासकर विजय, सुचेता तालुकराज, प्रिया रंजन, दोलन सावंत, योगेंद्र भारद्वाज, विकास पटेल यांचा समावेश आहे. हिंसाचारप्रकरणी आत्तापर्यंत तीन गुन्हे दाखल झाले असून, अद्याप कोणत्याही संशयिताला अटक करण्यात आलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
मात्र, आईषी घोषचे हीने हे आरोप फेटाळले असून मी काहीही चुकीचे केलेले नसून, पोलिसांना घाबरत नाही. कायद्याच्या बाजूने आम्ही ठाम, लोकशाही मार्गाने चळवळ पुढे नेऊ. पोलिसांनी माझ्याविरोधातील पुरावे सार्वजनिक करावेत, माझ्यावरील हल्ल्याचे पुरावे मी सादर करू शकते. मी कोणावरही हल्ला केलेला नसून, पोलिसांचे आरोप खोटे आहे. असे घोष हीने ठामपणे सांगितले.
दरम्यान, हिंसाचारानंतर केंद्र सरकारने अखेर आज नमते घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या सचिवांनी विद्यापीठाचे कुलगुरू आणि विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. या चर्चेमध्ये विद्यार्थ्यांकडून वाढीव शुल्क न घेण्यावर, तसेच हिवाळी सत्राच्या नोंदणीला मुदतवाढ देण्यावर सहमती झाली आहे.
कुलगुरू हटाओ मागणी कायम
विद्यार्थी मात्र कुलगुरू हटाओच्या मागणीवर ठाम आहेत. केंद्रीय शिक्षण सचिव अमित खरे यांनी कुलगुरू एम. जगदीशकुमार यांना बोलावून घेत, तसेच जेएनयूतील विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींशीही चर्चा केली. यात “जेएनयूएसयू’ची अध्यक्षा आईशी घोष हिचाही समावेश होता. या भेटीनंतर कुलगुरू जगदीशकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना विद्यापीठात स्थिती सुधारल्याचा दावा केला.
- महिलेच्या धाडसामुळे वाचला तरुणाचा जीव
- तीन लाख लाडक्या ‘बहिणी’ राहिल्या वंचित
- एस. एम. जोशी कॉलेजमध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती साजरी
- विद्यार्थ्यांनो आवडीच्या क्षेत्रात करिअर करा; राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे आवाहन
- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत मोरया पुरस्काराचे परीक्षण