अभिनेत्री दीपिकाचा मोदी सरकारच्या जाहीरातीवरील प्रोमो व्हिडीओ हटवला

अभिनेत्री दीपिकाचा मोदी सरकारच्या जाहीरातीवरील प्रोमो व्हिडीओ हटवला

नवी दिल्ली : जेएनयू हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची अभिनेत्री दीपिका पादुकोन विद्यापीठात जाऊन भेट घेतल्यानं दीपिका सोशल मीडियासह राजकीय वर्तुळातही चर्चेला आली. यावरून तीच्यावर झालेल्या टीका- कौतुकानं राजकिय वातावरण तापलं असतानाच आता दीपिकाचा सरकारी जाहिरातील प्रोमो व्हिडीओ हटवला असल्याची बाब समोर आली आहे. याबाबत हिंदूस्थान टाईम्सने वृत्त प्रकाशित केले आहे.

दीपिका ही मोदी सरकारच्या कौशल्य विकास विभागाच्या एका जाहिरातीत दिसली. बुधवारी हा व्हिडिओ प्रदर्शितही झाला होता. श्रम शक्ती भवनच्या कार्यालयात हा व्हिडिओ व्हायरलही झाला होता. मात्र अचानक हा व्हिडीओ वगळण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मंत्रालयातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं द प्रिंटला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं.

दीपिकानं ४५ सेकंदाचा व्हिडीओ चित्रीत केला होता . यात प्रत्येक नागरिकाला समान संधी आणि कौशल्यविकासाबद्दल तिनं भाष्य केलं होतं. या व्हिडीओची निर्मिती होण्याआधी कौशल्य विकास मंत्रालयानं दीपिकाची अॅसीड हल्ल्यातील पीडितांशी भेट घडवून दिली होती. मात्र आता ‘दीपिकासोत कोणताही औपचारिक करार नव्हता. कौशल्य विकासासाठी अनेक जाहिराती केल्या जातात, विभागाला जाहिरातीसाठी अनेक सर्जनशील कल्पना मीडिया हाऊसकडून सुचवल्या जातात. छपाकच्या टीमनं चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमच्याशी संपर्क साधला’, अस विभागानं प्रिंटला सांगितलं.

दरम्यान, दीपिकाच्या टीमनं हा व्हिडीओ आम्हाला पाठवला होता त्याचं मुल्यमापन सुरु आहे असं विभागानं सांगितलं. मात्र दीपिकानं यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.