मर्यादित सभासदांच्या उपस्थित काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन साजरा

मर्यादित सभासदांच्या उपस्थित काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन साजरा

पिंपरी चिंचवड : काळेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक संघाचा २३ वा वर्धापन दिन संघाच्या विरंगुळा केंद्रात शासनाच्या नियमानुसार नियमाचे पालन करून मर्यादित पन्नास मान्यवर महिला व पुरुष सभासदांच्या उपस्थित हा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संघाचे सभासद कार्याध्यक्ष सुरेश नढे पाटील हे होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाचे सह. सचिव मधुकर कसबेकर हे होते. संघाचे अध्यक्ष दशरथ वीर उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, महिला उपाध्यक्ष श्रीमती विमल ओतारी उपस्थित होते.

दिपप्रज्लन व गणेश पुजन करुन कार्यक्रमाचे प्रस्तावित व संघाचा तेविस वर्षाचा लेखा जोखा संघाचे सचिव पदमाकर जांभळे यानी सादर केला. उपस्थित मान्यवरांचा सत्कार करुन संघाचे दानशूर व्यक्ती धनराज एडके, दत्तात्रेय शेडगे, विषेश सहकार्य धर्माजी पवार विषेश पदनियुती व संगीता कोकणे यांची निवड या बद्दल सत्कार करण्यात आला. मान्यवर उपस्थितानी सभासदाना संघाचे कार्याबद्दल मार्गदर्शन केले संघाचे पदाधिकारी यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला, व ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. सहखजिनदार प्रमिला देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Actions

Selected media actions