‘आखियोंसे गोली मारे’वर कार्तिक, अनन्या आणि भूमीचे ठुमके

'आखियोंसे गोली मारे'वर कार्तिक, अनन्या आणि भूमीचे ठुमके

लोकमराठी : काही दिवसांपूर्वीच ‘पती पत्नी और वो’चा ट्रेलर रिलीज झाला होता. कार्तिक आर्यन, अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर यांनी या ट्रेलरमध्ये चांगलीच मजा आणली आहे. बुधवारी (दि. 20) या चित्रपटातील ‘आखियोंसे गोली मारे’ हे गाणे लॉन्च झाले. या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर हा चित्रपट कसा असले व या तिघांचा अभिनय कसा असेल याची उत्सुकता सर्वांना आहे.

त्यातच हे गाणे आल्याने या चित्रपटाकडून पुन्हा एकदा आपेक्षा उंचावल्या आहेत. ‘आखियोंसे गोली मारे’ या गाण्यात चिंटू (कार्तिक आर्यन), वेदिका (भूमी पेडणेकर) आणि तपस्या (अनन्या पांडे) यांनी कमाल डान्स केलाय. तर मिका सिंग आणि तुलसी कुमारने आपल्या आवाजाची जादू दाखवली आहे. तनिष्क बागचीने या गाण्याला संगीत दिले आहे. तर यापूर्वी सोनू निगमने गायलेले दुल्हे राजामधील ‘आखियोंसे गोली मारे’ हे गाणेही अत्यंत लोकप्रिय झाले होते. या गाण्याचे काही बोल नव्या गाण्यातही घेतले आहेत.