‘देवघर चषक २०२२’ क्रिकेट स्पर्धेत खेड बॉईजने प्रथम, नवतरुण क्रीडा मंडळ चाटवने द्वितीय तर शिवशंभू प्रतिष्ठाण बिजघरने पटकावला तृतीय क्रमांक

'देवघर चषक २०२२' क्रिकेट स्पर्धेत खेड बॉईजने प्रथम, नवतरुण क्रीडा मंडळ चाटवने द्वितीय तर शिवशंभू प्रतिष्ठाण बिजघरने पटकावला तृतीय क्रमांक

देवघर (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : शिवजयंतीनिमित्त आयोजित भव्य ‘देवघर चषक 2022’ क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक खेड बॉईज तर द्वितीय क्रमांक नवतरुण क्रीडा मंडळ चाटव व तृतीय क्रमांक शिवशंभू प्रतिष्ठाण बिजघर या संघाने पटकावले. त्यांना आयोजकांच्या वतीने प्रथम क्रमांक विनोद मोरे, समस्थ ग्रामस्थ देवघर उगवतवाडी व मान्यवर, द्वितीय क्रमांक रुपेश मोरे व तृतीय क्रमांक मंदार मोरे यांच्या हस्ते रोख स्वरूपात पारितोषिक ट्रॉफी व मेडल देण्यात आले.

या स्पर्धेचे आयोजन देवघर उगवतवाडी येथील सर्व युवा तरुण मित्रानी केले होते. यामध्ये प्रामुख्याने खेम काळकाई वाक्षेपवाडी, शिवशंभू प्रतिष्ठान बिजघर, नांदिवली विट्ठलवाडी, प्रचीती हनुमान मंडळ मांडवे, भैरवनाथ प्रसन्न घोगरे, नवतरुन क्रीडा तरुण मंडळ चाटव, कोतवाल संघटना खेड, शिवतेज युवा प्रतिष्ठान चाटव, झोलाई योद्धा आंबवली, जय हनुमान कुडोशी, झापाडी, जय हनुमान तळे जांभुळवाडी, फ्रेंड सर्कल, सुरज 9 खेड, मोहाने मयूरवाडी क्रिकेट क्लब, खेड बॉईज, ओम साई भरणे, निसनाई क्रीडा मंडळ वडगाव, वाघजाई क्रीडा मंडळ तळे देऊळवाडी, वंश 11 सुकिवली, मोरवंडे या संघानी सहभाग घेतला होता.

तसेंच उत्तम गोलंदाज फलंदाज व मालिकावीर यांना कामगार नेते डॉ. कैलास कदम (शहराध्यक्ष काँग्रेस पार्टी पिं चिं शहर व जिल्हा) व सदगुरु नाना कदम ( माजी नगरसेवक पिं चिं महानगरपालिका) यांच्या माध्यमातुन ट्रॉफी रोख स्वरूपात पारितोषिक देण्यात आले. या कार्यक्रमाला राजकीय सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन देवघर उगवतवाडी येथील सर्व युवकानी केले तर सूत्रसंचालन कु वैभव व ओंकार मोरे यांनी केले.