खेळ रंगला गृहलक्ष्मीचा संगे पैठणीचा’ कार्यक्रम अजमेरा कॉलनी आणि खराळवाडी येथे संपन्न

खेळ रंगला गृहलक्ष्मीचा संगे पैठणीचा’ कार्यक्रम अजमेरा कॉलनी आणि खराळवाडी येथे संपन्न

निर्मला कदम यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मालती मोहिते आणि सुनिता राजपूत यांना मिळाली स्कुटी पेप

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माजी नगरसेविका निर्मला सद्‌गुरु कदम यांनी खराळवाडी बालभवन प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या क्रीडांगणावर आणि डॉ. मनिषा सुमंत गरुड (गायकवाड) यांनी अजमेरा कॉलनी येथिल डॉ. केशव हेडगेवार क्रीडा संकुल येथे ‘खेळ रंगला गृहलक्ष्मीचा संगे पैठणीचा’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात लकी ड्रॉ व्दारे स्कुटी पेपसह इतर दहा बक्षिसे, शंभर पेक्षा जास्त पैठणी आणि प्रत्येक बरोबरच्या उत्तरास चांदिचे नाणे ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया मराठे यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम, माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक सद्‌गुरु कदम, माजी नगरसेविका निर्मला सद्‌गुरु कदम, कॉंग्रेसचे युवक शहराध्यक्षा नरेंद्र बनसोडे, कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा सायली नढे तसेच ज्ञानेश्वर मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, आबा खराडे आदींसह शेकडो सहभागी महिला उपस्थित होत्या.


प्रसिध्द निवेदक कुमार मारणे यांनी सहभागी महिलांना विविध सामाजिक, ऐतिहासिक आणि प्रबोधनात्मक प्रश्न विचारुन कार्यक्रमात रंगत आणली. लकी ड्रॉ आणि प्रश्नोत्तरात विजयी झालेल्या महिलांच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहत होता. या कार्यक्रमातील प्रथम क्रमांकाचे स्कुटी पेप चे बक्षिस मालती आत्माराम मोहिते आणि सुनिता प्रमोद राजपूत यांना मिळाले. तर सुषमा जाधव आणि आंसणा अडोद्रा यांना फ्रिज ; अलका वसंत लष्करे आणि हर्षदा सचिन कुंभार यांना कलर एलइडी टिव्ही ; भटाबाई सीताराम जाधव आणि श्रध्दा प्रकाश जाधव यांनी कुलर ; स्वाती रविंद्र शिंदे आणि दुर्गा प्रविण जाधव यांना मोबाईल ; सोनाली रुपेश हेंद्रे आणि सोनू अनिल दमवाणी यांना मायक्रो ओव्हन ; रमाबाई चंद्रकांत सोनफुले आणि स्वाती कानवटे यांना सोन्याची नथ ; समिक्षा प्रशांत साळवी आणि वैशाली नारायण वाणी यांना ओटीजी ओव्हन ; गीता नितीन आरबेकर आणि मनिषा अजित पवार यांना मिक्सर आणि प्रश्नांची अचूक उत्तरे देणा-या सर्व महिलांना पैठणी तसेच झटपट प्रश्नोत्तरे देणा-या युवती आणि महिलांना चांदिचे नाणे देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या आयोजनात खराळवाडी, गांधीनगर, कामगार नगर, अजमेरा कॉलनी, मासुळकर कॉलनी, वास्तु उद्योग येथिल महिलांनी सहभाग घेतला होता.