जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डॉ. डी. वाय. पाटील परिवारतर्फे वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डॉ. डी. वाय. पाटील परिवारतर्फे वृक्षारोपण

पिंपरी : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून डॉ. डी. वाय. पाटील डेंटल कॉलेज आणि डॉ. डी. वाय. परिवार यांच्या पुढाकाराने दुर्गा टेकडी इथे पक्षांसाठी विविध फळ झाडांचे रोपण करण्यात आले. त्याप्रसंगी जगा व जगू द्या चे डॉ संदीप बाहेती, उद्यान प्रमुख श्री. वाईकर, डेंटल कॉलेजचे डॉ. प्रज्ञा बारसे, डॉ. गौरी भोसले, डॉ. उत्कर्षा चौधरी, डॉ. श्रुती तुंगार इत्यादी उपस्थित होते.

निसर्ग हाच आपला पालनकर्ता असून त्याचे संरक्षण आणि जोपासना करणे, हे आपले कर्तव्य आहे. असा संदेश डॉ. डी. वाय. पाटील परिवारतर्फे देण्यात आला. निसर्ग आपले निरंतर कोड कौतुक आणि पालन पोषण करत असतो. त्यावर आपण निरंतर प्रेम केले पाहिजे, असे डॉ संदीप बाहेती म्हणाले.

आजचे वृक्षारोपण हे अविस्मरणीय असून ही संधी आम्हाला आज मिळाली, याचा आम्हास अत्यानंद होत आहे. असे मनोगत उपस्थित डेंटल कॉलेजच्या डॉक्टरांनी व्यक्त केले.