इंदिरा गांधी हुतात्मादिन आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त काळेवाडीत रक्तदान शिबिर संपन्न

इंदिरा गांधी हुतात्मादिन आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त काळेवाडीत रक्तदान शिबिर संपन्न 

पिंपरी चिंचवड, ता. ३१ : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान व आयर्न लेडी इंदिरा गांधी यांच्या हुतात्मा दिनानिमित्त आणि लोहपुरुष स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने काळेवाडी येथे रक्तदान महाअभियान आयोजन केले होते. त्यामध्ये उत्स्फुर्तपणे रक्तदात्यांनी रक्तदान केले.

त्यावेळी इंदिरा गांधी व वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी प्रदेश सचिव गौरव चौधरी, उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, चिंचवड विधानसभा अध्यक्ष रोहित शेळके, जिल्हा सरचिटणीस विशाल कसबे, वसीम शेख, जिफिन जॉन्सन, विक्रांत सानप, सोशल मिडिया समन्वयक जय ठोंबरे आदी पदाधिकारी व पिंपरी चिंचवड ब्लड बँकेचे मकरंद शहापूरकर उपस्थित होते.

इंदिरा गांधी हुतात्मादिन आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त काळेवाडीत रक्तदान शिबिर संपन्न 

आजचा दिवस भारतासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. भारताचा इतिहास, राजकारणावर आपल्या कार्याने ठसा उमटवणाऱ्या दोन महान नेत्यांचा आजच्या दिवसाशी संबंध आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नेते, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन आहे. तर, ‘आर्यन लेडी’ इंदिरा गांधी यांची आजच्याच दिवशी हत्या झाली होती.

वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. सरदारांनी भारतातील 565 अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलीनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी आणि वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात.

इंदिरा गांधी हे भारताच्या राजकारणातील एक असे नाव ज्यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य नेहमीच चर्चेत राहिले. देशाच्या पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रधान या नात्याने त्यांनी असे अनेक निर्णय घेतले. त्या भारताच्या चार वेळा पंतप्रधान झाल्या. त्यांच्याच पंतप्रधानपदाच्या कार्यकालात 1971 साली पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि बांग्लादेशची निर्मिती झाली होती.