रहाटणीतील धर्मवीर संभाजीराजे उद्यानात ओपन जिम

रहाटणीतील धर्मवीर संभाजीराजे उद्यानात ओपन जिम

लोकमराठी न्यूज नेटवर्क

रहाटणी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने रहाटणी (प्रभाग क्रमांक 27) येथील धर्मवीर संभाजीराजे उद्यान येथे नवीन ओपन जिम तयार करण्यात आली आहे. या जिमचे उद्घाटन नगरसेवक चंद्रकांत अण्णा नखाते यांच्या हस्ते करण्यात आले.

त्याप्रसंगी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेविका सविता खुळे, चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष राजदादा तापकीर, युवा नेते शुभम नखाते व प्रभागातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.