वाढदिवसाचा खर्च टाळून कोरोना संरक्षणासाठी नागरिकांना मोफत मास्क वाटप | नगरसेवक चंद्रकांत नखाते यांचा पुढाकार

वाढदिवसाचा खर्च टाळून कोरोना संरक्षणासाठी नागरिकांना मोफत मास्क वाटप | नगरसेवक चंद्रकांत नखाते यांचा पुढाकार

लोकमराठी न्यूज नेटवर्क

रहाटणी : नगरसेवक चंद्रकांत अण्णा नखाते यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून जगभरात पसरलेल्या व भारतात दाखल झालेल्या कोरोना या संसर्गजन्य विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी मास्क वाटपाचा उपक्रम राबवला.

चीनमधून जगातील विविध देशात पसरलेल्या कोरोना वायरसमुळे हजारो नागरिकांचे बळी गेले असून भारतात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर नुकतेच करोनाचे रूग्ण पुणे व पिंपरी चिंचवड शहरात आढळल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, योग्य काळजी व उपाययोजना केल्यास करोनापासून संरक्षण करणे सहज शक्य आहे. असे सरकार व डॉक्टरांडून सांगितले जात आहे.

सामाजिक बाधिलकी व मास्कचा तुटवडा लक्षात घेता नागरिकांचे कोरोनापासून सरंक्षण व्हावे, यासाठी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रहाटणीतील शाळेत मुला-मुलींना, सोसायटी सदस्य व ज्येष्ठ नागरिकांना मोफत मास्क वाटप केले.

त्यावेळी नगरसेवक चंद्रकांत नखाते, बापूसाहेब जाधव, सुनील नखाते, रवींद्र धुमाळ, शुभम नखाते, अविनाश नखाते, ऋषिकेश नखाते, सचिन गोडांबे, आकाश नखाते, स्‍वप्‍नील नखाते व चंद्रकांत नखाते युवा मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते.