एस. एम. जोशी कॉलेजमध्ये आंतरमहाविद्यालयीन जुडो स्पर्धेचे आयोजन

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये आंतरमहाविद्यालयीन जुडो स्पर्धेचे आयोजन

हडपसर (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील मुले काटक असतात. त्यांनी कठोर परिश्रम करून खेळातील संधी ओळखून त्याचा लाभ घ्यावा. त्यांनी खेळाचे नेतृत्व करावे. covid-19 च्या नियमांचे पालन करून स्पर्धा यशस्वी करावी, असे विचार रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीपआबा तुपे यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून विचार व्यक्त केले. ते एस. एम. जोशी कॉलेजमध्ये आंतर महाविद्यालय जुडो स्पर्धेत (मुले-मुली) बोलत होते.

याप्रसंगी पुणे जिल्ह्याचे क्रीडा समितीचे सचिव डॉ. रमेश गायकवाड यांनी मोलाचे विचार व्यक्त केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे खिलारे साहेब यांनी व्यक्त केले. खेळातूनच खिलाडूवृत्ती येते. निकोप शरीरात, निकोप मन वसत असते. युवकांनी खेळ खेळून आरोग्य उत्तम ठेवावे. असे विचार व्यक्त केले. स्पर्धेचे संयोजन क्रीडा संचालक प्रा. डी एल. वसावे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. मनमोहनसिंग पाडवी यांनी मानले.