PIMPLE GURAV : अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना

PIMPLE GURAV : अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना

पिंपळे गुरव : अंनतनगर तरुण मित्र मंडळ ५० वर्षात पदार्पण करत असून मंडळाच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. गणेशाचे आगमन दिमाखात केले. त्यावेळी विद्युत रोषणाईने मंदिर रथ उजळून गेला होता. चोकाचौकांत फटक्यांची अतिशबाजी करण्यात आली.

मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पारंपारिक पोषाख परिधान करून ढोल-ताशांच्या गजरात गणराजाचा जयघोष केला. यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणूकीत चंद्रकांत कदम यांच्या ढोल-ताशा संघाने परिसर दणाणून सोडला. त्यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

यावेळी मंडळीची आरती तानजी बेडके व सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील टोणपे यांच्या हस्ते करण्यात अली. तसेच काल प्रसिद्ध उद्योजक शंकरशेठ जगताप यांच्या हस्ते मंडळाच्या गणपतीची आरती करण्यात आली.