पिंपळे सौदागर (पुणे) : वै. ह. भ.प पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचलित पी. के. इंटरनॅशनल स्कूल ॲण्ड जुनियर कॉलेजमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १०३ वी पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे व प्राचार्या धनश्री सोनवणे यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्राचार्या धनश्री सोनवणे यांनी या महापुरूषांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. विद्यार्थ्यांनी देखील भाषणे सादर केली.
या कार्यक्रमास विद्यार्थ्यांना समवेत सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदेशना चक्रबर्ती यांनी केले. तर आभार सुवर्णा धातरक यांनी मानले.