Tag: Lokshahir Annabhau Sathe

Pimple Saudagar : पी. के. इंटरनॅशनल स्कूलमध्ये लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
शैक्षणिक

Pimple Saudagar : पी. के. इंटरनॅशनल स्कूलमध्ये लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

पिंपळे सौदागर (पुणे) : वै. ह. भ.प पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचलित पी. के. इंटरनॅशनल स्कूल ॲण्ड जुनियर कॉलेजमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १०३ वी पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे व प्राचार्या धनश्री सोनवणे यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्राचार्या धनश्री सोनवणे यांनी या महापुरूषांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. विद्यार्थ्यांनी देखील भाषणे सादर केली. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांना समवेत सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदेशना चक्रबर्ती यांनी केले. तर आभार सुवर्णा धातरक यांनी मानले. ...
साहित्य सम्राट अण्णा भाऊंच्या फकिराला जोगणी मिळाली – कवी. विनोद अष्टुळ
पुणे

साहित्य सम्राट अण्णा भाऊंच्या फकिराला जोगणी मिळाली – कवी. विनोद अष्टुळ

निगडी प्राधिकरण, (बाबू डिसोजा कुमठेकर) : साहित्य सम्राट पुणे व मातंग विकास संस्था खडकी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळ तीन दिवसाचे धरणे आंदोलन आयोजित केले होते. साहित्य सम्राटचे संस्थापक विनोद अष्टुळ यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मातंग विकास संस्थेचे संस्थापक राजेश रासगे, समाजभूषण पुरस्कारथी शंकरभाऊ तडाखे, अखिल भारतीय बहुजन सेनेचे निलेश वाघमारे, गणेश भालेराव, लहुजी महासंघाचे प्रकाश वैराळ, लहुजी पॅन्थर संघटनेचे महेश सकट, सुनील मोरे सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे उपकुलसचिव माननीय डॉ. मुंजाजी रासवे यांनी आंदोलनस्थळी शुद्धीपत्र मिळणे बाबत या विषयास अनुसरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम. ए. मराठी अभ्यासक्रमातील ग्रामीण साहित्य आणि शोध या ग्रंथातील अण्णा भाऊ साठे यांच्या “फकीरा” य...
पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसतर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन 
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसतर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

निगडी, ता. ०१ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निगडी येथील त्यांच्या पुतळ्यास पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी पिंपरी चिंचवड काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सजी वर्की, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, प्रदेश सचिव गौरव चौधरी, जिल्हा सरचिटणीस विशाल कसबे, वसीम शेख, विक्रांत सानप, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप व इतर युवक कार्यकर्ते उपस्थित होते. समाजसुधारक, समाजप्रबोधनकार अशा विविध पैलूंपैकी जागतिक ख्यातीचे लेखक म्हणून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची ओळख आहे. भारतीय भाषेसह जगातील अनेक भाषांमधे त्यांच्या पुस्तकांची भाषांतर झाले आहे. त्यांची आज जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्यानिमित्त निगडी येथील त्यांच्या पुतळ्यास हजारो...
केंद्र सरकारने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव महापुरूषांच्या यादीतून वगळल्याने पिंपरीत निदर्शने
पिंपरी चिंचवड

केंद्र सरकारने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव महापुरूषांच्या यादीतून वगळल्याने पिंपरीत निदर्शने

पिंपरी, ता. ५ जानेवारी : पिंपरी-चिंचवड मातंग समाजाच्या वतीने साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव महापुरूषाच्या यादीत नाकारल्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकार विरोधात संपूर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटले असून राज्यभर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलने व निदर्शने चालू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज पिंपरी चिंचवडमधील मातंग समाजाच्या वतीने जेष्ठ नेते संदिपान झोंबाडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी केंंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाचा जाहीर निषेध करण्यात आला. सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर फौंडेशनचे काम चालते. त्याचा संचालक म्हणून विकास त्रिवेदी काम करतो. त्याचे म्हणणे असे आहे की, अण्णाभाऊ साठे हे प्रसिद्ध व्यक्ती नाहीत म्हणून नाव समाविष्ट केले नाही. अण्णाभाऊ साठे विज्ञानवा...
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची आमदार अमोल मिटकरींची मागणी
पुणे

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची आमदार अमोल मिटकरींची मागणी

शिवशाही व्यापारी संघटनेचे अध्यक्ष युवराज दाखलेंकडून मिटकरी यांचे आभार पुणे : मुंबईसह अखंड महाराष्ट्र चळवळीचे प्रणेते लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना सर्वोच्च असा भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी विधानपरिषदेमध्ये केली. मिटकरी यांच्या मागणीचे शिवशाही व्यापारी संघ तसेच सकल मातंग व अखंड बाराबलुतेदार समाजाचे अध्यक्ष युवराज दाखले यांनी स्वागत केले आहे. याविषयी बोलताना दाखले म्हणाले की, आजपर्यंत मातंग समाजातील अनेक नेते आमदार, खासदार, मंत्री झाले. मात्र कोणीही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली नाही. ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे. मात्र अमोल मिटकरी यांनी समस्त मातंग समाजाच्या भावना सरकारपर्यंत पोहचविल्या आहेत. सरकारने मिटकरी यांच्या मागणीचा विचार करून लवकरात लवकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे. अ...