पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसतर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसतर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन 

निगडी, ता. ०१ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निगडी येथील त्यांच्या पुतळ्यास पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

त्याप्रसंगी पिंपरी चिंचवड काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सजी वर्की, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, प्रदेश सचिव गौरव चौधरी, जिल्हा सरचिटणीस विशाल कसबे, वसीम शेख, विक्रांत सानप, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप व इतर युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसतर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन 

समाजसुधारक, समाजप्रबोधनकार अशा विविध पैलूंपैकी जागतिक ख्यातीचे लेखक म्हणून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची ओळख आहे. भारतीय भाषेसह जगातील अनेक भाषांमधे त्यांच्या पुस्तकांची भाषांतर झाले आहे. त्यांची आज जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

त्यानिमित्त निगडी येथील त्यांच्या पुतळ्यास हजारो अनुयायांसह विविध क्षेत्रातील मान्यवर पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यास येतात. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने त्यांच्या स्मारकाच्या शेजारील प्रांगणात समाजप्रबोधनकार कार्यक्रमाचेआयोजन करण्यात आले आहे.