
पिंपरी, ता. ५ जानेवारी : पिंपरी-चिंचवड मातंग समाजाच्या वतीने साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव महापुरूषाच्या यादीत नाकारल्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकार विरोधात संपूर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटले असून राज्यभर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलने व निदर्शने चालू आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून आज पिंपरी चिंचवडमधील मातंग समाजाच्या वतीने जेष्ठ नेते संदिपान झोंबाडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी केंंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाचा जाहीर निषेध करण्यात आला. सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर फौंडेशनचे काम चालते. त्याचा संचालक म्हणून विकास त्रिवेदी काम करतो. त्याचे म्हणणे असे आहे की, अण्णाभाऊ साठे हे प्रसिद्ध व्यक्ती नाहीत म्हणून नाव समाविष्ट केले नाही.
अण्णाभाऊ साठे विज्ञानवादी, प्रयत्नवादी, वास्तववादी विचाराचे लोकशाहीर, साहित्यीक, कामगार नेता, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी नेतृत्व होते. अण्णाभाऊंनी असे लिहून ठेवले आहे की, पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर उभी नसून कमगाराच्या श्रमिकाच्या तळहातावर तरली आहे. म्हणून या मनूवादी संचालकाने अण्णाभाऊचे नाव घेण्याचे नाकारले असावे. म्हणून या संचालकाचा व सामाजिक न्याय मंत्रालयाचा जाहीर निषेध करीत आहोत. या मंत्रालयाने तात्काळ अण्णाभाऊ साठे यांचे नाव प्रबोधनकारांच्या यादीत सामाविष्ठ करावे, ही मागणी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली.
या आंदोलनात सर्वश्री भगवान शिंदे, प्रल्हाद कांबळे, नाना कसबे, संजय ससाणे, गणेश आडागळे, राजू आवळे, संदीप जाधव, दत्तू चव्हाण, विशाल कसबे, अण्णा कसबे, गणेश साठे, दादाभाऊ आल्हाट, आबा भवाळ, हनुमंत वाघमारे, सतीश कांबळे, नितीन घोलप, मीना कांबळे, मालन गायकवाड, नंदा कांबळे, मारूती दाखले, अक्षय दुनघव, आकाश शिंदे, प्रा. बी, बी. शिंदे, दुराजी शिंदे, उमेश हानवते, सतीश भवाळ, विट्ठल शिंदे, कल्पना कांबळे, चांदणी सरवदे, वैशाली कांबळे, अंजना जगताप, छबु कांबळे, दशरथ कांबळे, कैलास कसबे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
- ‘सायकलकरी वारकऱ्यांच्या’ पुणे-पंढरपूर-पुणे वारीमुळे पर्यावरण बचतीचा संदेश – संजयशेठ भिसे
- या कारणासाठी केला मित्राचा गोळ्या झाडून खून
- सिनेर्जी हॉस्पिटलमध्ये ह्रदयाची अवघड बेंटाल सर्जरी यशस्वीरित्या संपन्न
- पोलीस सारथीच्या काळेवाडी रहाटणी विभाग युवकाध्यक्षदी छगन जायभाये यांची नियुक्ती
- आजचा दिवस दसरा दिवाळीसारखा आनंदाचा – खासदार डॉ. अमोल कोल्हे