वर्ध्यातील सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ( Narendra Modi ) राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केला.
महाराष्ट्रातील वर्ध्यातील सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार देशातील वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. शरद पवार कुठलीही कृती विचाराशिवाय करत नाहीत असे बोलले जाते. शरद पवारांनी आधी निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते. पण हवा कुठल्या दिशेने वाहत आहे हे शरद पवारांना माहित आहे. म्हणून त्यांनी निवडणूक न लढवण्याच निर्णय घेतला असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कौटुंबिक लढाई सुरु आहे. शरद पवारांचे पुतणे राष्ट्रवादीवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. अजित पवारांच्या हातून शरद पवार हिट विकेट झाले आहेत असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी कुंभकर्णासारखी आहे. महाराष्ट्रात सत्तेत असताना ते सहा-सहा महिने झोपून राहतात. मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातील भ्रष्टाचार, घोटाळयांच्या आरोपांची उदहारणे दिली.
महाराष्ट्रातील शेतकऱ्याने धरणात पाण्याची मागणी केली तेव्हा अजित पवारांनी काय उत्तर दिले हे तुम्हाला माहित आहे. मावळमध्ये पवार कुटुंबाने शेतकऱ्यांवर गोळया चालवण्याचे आदेश दिले. स्वत: शेतकरी असून शरद पवार शेतकऱ्यांच्या समस्या विसरले. शरद पवारांचे लक्ष शेतकऱ्यांवर नव्हते असे पंतप्रधान मोदी म्हणाले.