प्रबुद्ध संघातर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

प्रबुद्ध संघातर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

चिंचवडगाव : येथील प्रबुद्ध संघाच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यांच्या प्रतिमेला अध्यक्ष किशोर सोनवणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

त्यानंतर प्रत्येक सभासदांनी पुष्प अर्पण केले व मेनबती लाऊन अभिवादन केले. सामुदायिक बुद्ध वंदन घेण्यात आली. डॉ. आंबेडकर यांच्या समतामूलक विचारांमुळे आज भारतात लोकशाही टिकून आहे. वेगवेगळ्या जाती जमाती, वेगवेगळ्या भाषा असून ही भारताची लोकशाही जगात मोठी असून ती टिकून आहे. ती केवळ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानामुळेच. असं मनोगत डॉ धर्मेंद्र रामटेके यांनी व्यक्त केले.

प्रस्तावना व आभारप्रदर्शन सचिव किशन बलखंडे यांनी केले. कार्यक्रमात सहभागी कार्यकारिणी सदस्य प्रतिमा साळवी, राजू वासनिक, दिंगबर घोडके व प्रबुद्ध संघाचे सर्व सभासद उपस्थित होते.