प्राध्यापक केतन देसले यांचा ‘यंग लीडरशीप इन एज्युकेशन’ पुरस्काराने गौरव


प्राध्यापक केतन देसले यांचा 'यंग लीडरशीप इन एज्युकेशन' पुरस्काराने गौरव
डॉ. एच. के . सरदाना यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना प्रा. केतन देसले.

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे (पीसीसीओई) संगणक विभागाचे प्रा. केतन देसले यांचा भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचे मुख्य संशोधक (CSIR-CSIO) डॉ. एच. के. सरदाना यांच्या हस्ते ‘यंग लीडरशीप इन एज्युकेशन 2019’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

आयआयटी पटना आणि टेक प्रोलॅब्ज (TechProlabz) यांच्या संयुक्त विद्यमाने “इंडियन एज्युकेशन ॲवॉर्ड 2019” चे आयोजन नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात प्रा. देसले यांना सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्राध्यापकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.

प्रा. देसले हे पीसीसीओईआरमध्ये संगणक अभियांत्रिकी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची शिकवण्याची नाविन्यपूर्ण पद्धती, विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन, विद्यार्थ्यांचे अभिप्राय या बाबी विचारात घेऊन तसेच संस्थेची डिजिटल प्रसिद्धीची जबाबदारी सक्षमपणे सांभाळली आहे. राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत त्यांचे काम आणि विद्यार्थ्यांची जडणघडण यात महत्वपूर्ण योगदान आहे.

या पुरस्काराबद्दल पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही.एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. ए. एम. फुलंबरकर यांनी प्रा. देसले यांचे अभिनंदन केले.

Prof Ketan Desale’s Young Leadership in Education award