मोहम्मद पैगंबर बिलाच्या जनजागृतीसाठी औरंगाबादमध्ये १४ मार्चला जाहीर सभा

मोहम्मद पैगंबर बिलाच्या जनजागृतीसाठी औरंगाबादमध्ये १४ मार्चला जाहीर सभा

.

  • वंचितचे सर्वेसर्वा ॲड. बाळासाहेब आंबेडकर, रेखा ठाकूर यांची उपस्थिती

औरंगाबाद : धार्मिक प्रतिकांचा गैरवापर करून दंगल घडविण्याचे षड्यंत्र करणाऱ्या विरोधात कडक कायदा करण्या साठी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी विधान परिषदेमध्ये मोहम्मद पैगंबर बिल सादर केले आहे या बिलाच्या जनजागृतीसाठी औरंगाबादेत 14 मार्च रोजी जाहीर सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारूक अहमद व मुस्लिम इत्तेहाद फ्रंटचे संस्थापक अध्यक्ष जावेद कुरेशी यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत दिली.

यासंदर्भात अधिक माहिती देताना फारूक अहमद म्हणाले हमखास मैदानावर सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आलेल्या या जाहीर सभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर प्रा अंजलीताई आंबेडकर मुस्लिम धर्मगुरू यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे हिंदू-मुस्लीम यांच्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण व्हावे यासाठी काही प्रवृत्ती कार्यरत आहे. महामानव आणि धर्माचे संस्थापक यांचा सोशल मीडिया वरून अवमान करून दंगल घडवण्याच्या काही शक्ती सातत्याने प्रयत्न करीत आहे या प्रवृत्तीला आळा बसावा आणि त्यांना कडक शासन व्हावे यासाठी ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी 17 जून 20 21 रोजी कायद्याचा मसुदा तयार करून शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या मार्फत 5 जुलै 2021 रोजी विधान परिषदेमध्ये मोहम्मद पैगंबर बिल सादर केले आहे.

परंतु या बिलावर अद्याप कुठलीही चर्चा झाली नाही विधानसभा व विधान परिषदेमध्ये चर्चा होऊन बिल पास व्हावे यासाठी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने सातत्याने आंदोलन केली जात आहे या बिलाच्या जनजागृतीसाठी औरंगाबादेत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे हा कायदा अस्तित्वात आला तर महामानवाची बदनामी किंवा अवमान करणाऱ्यांना जामीन मिळणार नाही शिवाय त्यांना कडक शासन मिळेल हे बिल पास व्हावे म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सातत्याने प्रयत्न केले जात आहे परंतु स्वताला धर्मनिरपेक्ष म्हणणारे पक्षही त्यापासून अलिप्त राहात आहे. असे सांगून श्री फारूक अहमद म्हणाले या बिलाच्या जनजागृतीसाठी जनतेमध्ये जाण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबादेत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभा आणि विधान परिषद हे बिल मंजूर होण्यासाठी सर्वच पक्षाच्या आमदारांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या जनजागृती जाहीर सभेसाठी धर्मगुरूंना निमंत्रित करण्यात आले आहे या जाहीर सभेसाठी मराठवाड्यातील सर्व लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी केले या पत्रकार परिषदेला अमित भुईगळ पश्चिमचे जिल्हाध्यक्ष योगेश बन माजी नगरसेवक मिलिंद दाभाडे कृष्णा बनकर मध्यचे शहराध्यक्ष जलीस अहमद भगवान खिलारे राजीव देहाडे आदी उपस्थित होते.

हिजाब गर्लचा औरंगाबादेत सत्कार

हिजाब आणि शिक्षणाच्या हक्कासाठी लढणाऱ्या कर्नाटकातील बेबी मुस्कान खान हिचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे कर्नाटकातील काही संस्थाचालकांनी मुस्लिम मुलींना हिजाबचा पेहरावा करण्यास मनाई केली आहे त्याविरोधात बेबी मुस्कान खानने आवाज उठवला हिजाब घालून शाळेत जात असताना काही जातीवादी गुंडांनी तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला छेडछाड काढली मात्र ती डगमगली नाही उलट तिने त्यांचा मुकाबला केला शिक्षण संस्थाचालकांनी तिचा शिक्षणाचा हक्क हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला परंतु तिने हिजाब घालण्याचा अधिकार संविधानने मला दिला आहे असे सडेतोड उत्तर दिले बेबी मुस्कान व तिच्या पालकांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे देशात प्रथमच औरंगाबादेत तिचा सत्कार होणार असल्याचे फारूक आ अहमद व जावेद कुरेशी यांनी सांगितले.