एस. एम. जोशी कॉलेजमधील प्राध्यापकांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची गाईडशिप

एस. एम. जोशी कॉलेजमधील प्राध्यापकांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची गाईडशिप

हडपसर (प्रतिनिधी) : डॉ. एकनाथ मुंढे (अर्थशास्त्र) डॉ. अतुल चौरे (मराठी), डॉ. शहाजी करांडे (इंग्रजी), डॉ. शिल्पा शितोळे (बॉटनी), डॉ. ज्योती किरवे (कॉमर्स) या प्राध्यापकांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच. डी. गाईडशीप मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी त्यांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच एस. एम. जोशी महाविद्यालयातील बॉटनी विषयाचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत खिलारे, केमिस्ट्री विषयाचे डॉ.गजानन वाघ, डॉ.शकुंतला सावंत, डॉ.रंजना जाधव, मराठी विषयाचे डॉ.राजेंद्र ठाकरे, इतिहास विषयाचे डॉ. दिनकर मुरकुटे यांनाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच. डी. गाईडशिप असून, महाविद्यालयात केमिस्ट्री विभाग आणि मराठी विभागाचे पीएच. डी. चे संशोधन केंद्र आहे. या संशोधन केंद्रामार्फत आणि रिसर्च गाईड यांच्या माध्यमातून भविष्यात संशोधनास अधिक चांगली गती प्राप्त होईल. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत खिलारे यांनी दिली.