पिंपरी, (लोकमराठी) : नगरसेविका व महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती सुनिता हेमंत तापकीर आणि चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष राज हेमंत तापकीर यांनी प्रकाशित केलेल्या २०२० या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते आज करण्यात आले.
याप्रसंगी खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, महापौर माई ढोरे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडगिरे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक चंद्रकांत नखाते, भाजपा नेते अमोल थोरात यांच्यासह भाजपचे नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.