पुण्याच्या संशोधकाने भारतीय निवडणूक प्रशासन कार्यपद्धतीमध्ये सुचविले बदलः यामुळे ४५ लाख निवडणूक कर्मचाऱ्यांचा २३ मिनिटांचा वाचणार वेळ

पुण्याच्या संशोधकाने भारतीय निवडणूक प्रशासन कार्यपद्धतीमध्ये सुचविले बदलः यामुळे ४५ लाख निवडणूक कर्मचाऱ्यांचा २३ मिनिटांचा वाचणार वेळ

पुणे : भारत हा लोकशाही प्रधान देश आहे .लोकशाही म्हटली की निवडणुका आल्याच .निवडणूक प्रशासन ही एक स्वतंत्र व्यवस्था आहे .मतदान प्रक्रियेतील दिवस महत्त्वाचा असतो .त्यामुळे आपल्या देशाची लोकशाही पुढील पाच वर्षे टिकून असते .मतदान प्रक्रियेच्या दिवशी सकाळ ६ ते रात्री ९ किंवा १० वाजेपर्यंत कामकाज चालते. मतदान यंत्र ,व्ही व्ही पेट यंत्र ,बँलेट बॉक्स ,माहिती भरलेले फार्म हे निवडणूक आयोगाकडे जमा केले जातात .यातील प्रशासकीय प्रक्रिया अत्यंत किचकट व महत्त्वाची असते .याचा अप्रत्यक्षपणे कर्मचारी व अधिकाऱ्यांवर ताण असतो .एखादी जरी चूक झाली तरी मतदान प्रक्रिया नंतर पुन्हा घ्यावी लागते .अशी उदाहरणे आहेत .यामुळे कर्मचारी व अधिकारी यांच्यावर चौकशी समिती, निलंबन ,बडतर्फ अशा कारवाया होत असतात. भारतामध्ये ८० कोटी मतदार आहेत, मतदान केंद्रांची संख्या १० लाख ३५ हजार असते .यासाठी ४५ लाख कर्मचारी व अधिकारी काम करीत असतात.


यातील प्रशासकीय प्रक्रियेचा एक महत्वाचा भाग म्हणजे , ” निवडणूक आयोगाने दिलेल्या विहित नमुन्यातील अर्जांमध्ये सांख्यिकी माहिती व इतर माहिती भरून ते संविधानिक व असंविधानिक वर्गवारी करून ,पाकिटामध्ये भरून, सीलबंद करावे लागतात.” ही पाकिटे निळी,हिरवी, खाकी ,पिवळी अशी रंगीत असतात .त्यावरील मथळा (हेडींग) व मतदानाची माहिती भरलेले आयोगाचे फॉर्म पाहून व त्यावरील मथळा (हेडिंग )वाचून ते योग्य पाकिटात भरणे, हे वेळखाऊ काम व जोखमीचे काम असते. अंदाजे ते २३ प्रकारचे फॉर्म असतात. यामध्ये १८३२ प्रकारची माहिती भरावी लागते. सदरचे फॉर्म पांढऱ्या रंगाचे व त्यावर काळ्या शाईची छपाई असतात .या फॉर्मच्या चार प्रती तयार कराव्या लागतात .या प्रतींची झेराँक्स किंवा कार्बन कॉपी करण्यास परवानगी नाही. त्या पेनने लिहावे लागतात. या २३ प्रकारच्या फॉर्म वरील उजव्या कोपऱ्यामध्ये संविधानिक व असंविधानिक पाकिट निहाय गोल किंवा चौकोनी कलर कोड व त्यामध्ये काळया शाईने अनुक्रमांक छापल्यास हे काम अतिशय सुखकर व पूर्णपणे निर्दोष होईल. सध्या ५० मिनिटे ते १ तास २० मिनिटे एवढा वेळ लागतो .परंतु वरील प्रकारचे कलर कोडींग वापरल्यास प्रत्येक मतदान केंद्रावरचा २३ मिनिटांचा वेळ वाचेल.या नव्या संशोधनाचा प्रस्ताव पुण्यातील संशोधक डॉ. तुषार निकाळजे यांनी भारताचे मा.मुख्य निवडणूक आयुक्त ,नवी दिल्ली व इतर १६ राज्यांमधील राज्य निवडणूक आयुक्त यांना पाठविला आहे .डॉ.तुषार निकाळजे हे निवडणूक व प्रशासन विषयाचे अभ्यासक व संशोधक आहेत .तसेच ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,पुणे येथे शिक्षकेतर कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. सध्या डॉ. तुषार निकाळजे हे आणखी दोन नवीन संशोधनाच्या संकल्पनांवर काम करीत आहेत.यामुळे मतदान प्रक्रियेतील ४८ मिनिटांचा वेगळा वेळ वाचणार आहे.

पुण्याच्या संशोधकाने भारतीय निवडणूक प्रशासन कार्यपद्धतीमध्ये सुचविले बदलः यामुळे ४५ लाख निवडणूक कर्मचाऱ्यांचा २३ मिनिटांचा वाचणार वेळ
डॉ. तुषार निकाळजे


डॉ.तुषार निकाळजे याबाबत म्हणाले ,”मी या संकल्पनेची पेटंट किंवा कॉपीराइट स्वरूपात नोंद करून आर्थिक लाभ मिळवू शकलो असतो, परंतु संशोधक व नागरी सेवक असल्याने समाज किंवा देशाची उपयुक्तता असलेल्या ज्ञानाचा व्यवहार करणे मला योग्य वाटले नाही.भारतीय निवडणूक आयोगाशी सामंजस्य करार केलेल्या इतर ८२ लोकशाही प्रधान देशांनादेखील याचा उपयोग होऊ शकेन”.