शिवसेनेच्या काळेवाडी-रहाटणी विभाग महिला आघाडीतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

शिवसेनेच्या काळेवाडी-रहाटणी विभाग महिला आघाडीतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

काळेवाडी : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या जयंतीनिमित्त (Shivsena) शिवसेनेच्या काळेवाडी – रहाटणी विभागाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अस्मिता महिला बचत गटाचे उद्घाटन तसेच शिवसेना महिला आघाडीची विभागीय बैठक पार पडली.

यावेळी पिंपरी चिंचवड महिला संपर्क प्रमुख वैशाली सुर्यवंशी, उप जिल्हाप्रमुख वैशाली मराठे, शहर संघटीका उर्मिला काळभोर, चिंचवड विधानसभा संघटीका अनिता तूतारे, उप विधानसभा संघटीका-शारदा वाघमोडे, जाणीव फाऊंडेशनच्या सदस्या सुजाता नखाते, सुहासिनी महिला बचत गटच्या अध्यक्षा रूपाली दळवी, महिला विभागसंघटिका शिल्पा आनपान, उपविभाग अमृता सुपेकर, उपविभाग सविता सोनवणे, शाखा सघंटीका योगीता चौधरी, माधुरी चौघूले, रेखा तायडे, उपशाखाध्यक्षा माधुरी जंजाळ, वैशाली वायकूळ, लक्ष्मी कसबे या शिवसैनिक तर अस्मिता महीला बचत गटाच्या अध्यक्ष अंजली दिक्षित, अर्चना ढमढेरे, खजीनदार आशालता हारपूडे,‌ सदस्य अश्वीनी महाजन, शिवानी आजगूडे, शिल्पा पतंगे, रसीका कटके, शीतल तापकीर, तृप्ती गावडे, विजया पाटील, पूजा कुलकर्णी, वर्षा सूपेकर, अनिता पाटील उपस्थित होत्या.

या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीच्या धर्तीवर नियोजनात्मक चर्चा आणि महिला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच या निवडणुकीत काळेवाडी – रहाटणीत शिवसेनेचा झेंडा फडकविण्याचा संकल्पही करण्यात आला.

सुत्रसंचालन योगीता चौधरी यांनी केले तर आभार अमृता सुपेकर, सविता सोनवणे, विभाग संघटिका शिल्पा आनपान यांनी मानले.

सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त जगदीश काबरे यांचा लेख वाचा