आंतरराष्ट्रीय मानवी हक्क न्यायिक सुरक्षा परिषदेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी डॉ. देविदास शेलार यांची निवड

आंतरराष्ट्रीय मानवी हक्क न्यायिक सुरक्षा परिषदेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी डॉ. देविदास शेलार यांची निवड 

पिंपरी, दि. ०१ ऑक्टोबर २०२२ : आंतरराष्ट्रीय मानवी हक्क न्यायिक सुरक्षा परिषद ही समाजातील दुर्बल, अन्याय झालेल्या समाजाच्या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणारी संस्था आहे. त्याच्या पुणे जिल्हा ( पुणे व पिंपरी चिंचवड शहर ) अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार डॉ. देविदास हरिश्चंद्र शेलार यांची निवड करण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना डॉ. देविदास शेलार म्हणाले, “कि आमचा मुख्य उद्देश समाजाला गुन्हेगारी व गुन्हेगारांपासून मुक्त करणे, नागरिकांना कायदेशीर हक्क आणि योग्य न्याय देणे , जनतेच्या मनातून पोलिसांबद्दलची भीती दूर करणे, गरीब आणि असहाय लोकांना मदत करणे, महिलांवरील अत्याचार थांबवन्यासाठी कार्य करणे, पर्यावरणीय प्रदूषणास प्रतिबंध, भ्रष्टाचाराला आळा घालणे, लोकांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक करणे, सरकारी योजना सर्वसामान्य माणसापर्यंत (आम आदमीपर्यंत) पोहचवणे, समाजात प्रचलित असलेल्या कामगारांच्या शोषणाला प्रतिबंध करणे हा आहे.

डॉ. देविदास शेलार हे पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी येथील रहिवासी आहेत. ते पिंपरी-चिंचवड शहरात अनेक वर्षांपासून सर्व समाजातील वंचित दुर्बल घटकांना बरोबर घेऊन त्यांना न्याय मिळवून देणे यासारखे समाजसेवेचे कार्य करत आहेत. ते भारतीय जनता पक्षाच्या सांगवी-काळेवाडी मंडलचे उपाध्यक्ष देखील आहेत. कोणत्याही वादात न पडता कोरोना महामारीच्या काळात त्यांनी चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून वाखाण्याजोगी कामगिरी केली. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक परिषदेच्या वतीने पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवली आहे.