विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात त्रेमासिक सहविचार सभा संपन्न

विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात त्रेमासिक सहविचार सभा संपन्न

पुणे : विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात शिक्षकांच्या प्रलंबित कामासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने माजी शिक्षक आमदार भगवान सोळूंके यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच त्रेमासिक सहविचार सभेचे आयोजन केले होते. यावेळी करण्यात आलेल्या विविध विषयांवरील चर्चेदरम्यान प्रलबित प्रस्तावाचा ३१ मार्च २०२२ पूर्वी निपटारा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या सभेमध्ये खालील विषयावर चर्चा करण्यात आली.

१. सहविचार सभाचे शिक्षण अधिकारी, प्रशासन अधिकारी, गट शिक्षण अधिकारी स्तरावर त्रेमासिक सहविचार सभा घेणेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देणे व सहविचार सभेचे आयोजन करणे.

२. शिक्षणाधिकारी स्तरावरील प्रलंबित प्रस्तावाचा निपटारा मार्च २०२२ पूर्वी करणे.

३. मा. शिक्षणाधिकारी स्तरावरील सर्व प्रकारच्या प्रस्तावाच्या सादरीकरण पद्धतीमध्ये सुलभता, स्पष्टता, एकसूत्रीपणा निर्माण करणे.

४. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवापुस्तिका दुय्यम प्रत दयावी.

५. भविष्य निर्वाह निधीच्या हिशोब पत्रिका वेळेत वितरित करण्यात याव्यात.

६. शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांना वै्यक्तीक मान्यता प्रत मिळावी.

७. मुख्याध्यापकांच्या कार्यशाळा आयोजित करून प्रशासकीय कामाची, प्रस्तावाची माहिती, विविध शैक्षणिक शासकीय नियमावली बाबत प्रबोधन करावे.

८. शासकीय स्तरावरील प्रस्तावा मध्ये अर्थपूर्ण व्यवहार होईपर्यंत त्रुटी दाखविणे. अशा संबंधीत कार्यालयीन कर्मचाऱ्यावर योग्य ती कार्यवाही करणेबाबत

त्याप्रसंगी पिंपरी चिंचवड शहराचे महाराष्ट्र राज्य परिषदेचे अध्यक्ष सुभाष देवकाते, महिला आघाडी प्रमुख शोभा देवकाते, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, कार्यवाह अशोक जाधव, पुणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष गुलाबराव गवळे, कार्यवाह निलेश काशिद, खेड तालुका कार्यवाह राजू सोनवणे, जीवन जोशी आदी उपस्थित होते.

शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिर्डे यांना परिषदच्या कार्यकर्त्यांचे विद्यार्थी गुणवत्तेकडे लक्ष वेधण्यासाठी विविध प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्न करणेबाबत चर्चा केली. तसेच परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले व त्यांना प्रलबित प्रस्तावाचा निपटारा करण्यासाठी सकारात्मक प्रबोधन केले. निलेश काशिद यांनी सर्व मान्यवराचे आभार मानले. पिपंरी चिंचवड शहरातील शिक्षकांनी आपल्या प्रलबित प्रस्तावबाबत प्रश्नाबाबत कार्यकारणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेस लेखी स्वरूपात कळवावे अथवा संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.