Chinchwad : प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रबुद्ध संघातर्फे संविधान प्रस्ताविकेचे वाचन

Chinchwad : प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रबुद्ध संघातर्फे संविधान प्रस्ताविकेचे वाचन

चिंचवड : प्रबुद्ध संघाच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रदिप पवार होते. आपले ज्येष्ठ सभासद झिंगनाथ मोरे व प्रदिप पवार यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.

कार्यक्रमाची प्रस्तावना व संविधान प्रस्ताविकेचे वाचन प्रबुद्ध संघाचे सचिव किशन बलखंडे यांनी केले. मनोगतात प्रदिप पवार यांनी देशातील कामगार कामगार व शेतकरी यांच्या समस्या अवघड होत चालल्या आहेत. केंद्र केंद्र सरकार त्यांना न्याय देताना दिसत नाही. राज्यघटनेची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, असं मत त्यांनी मांडले. शुभेच्छापर भाषणात अध्यक्ष आयु किशोर सोनवणे, प्रमोद साळवी डॉ. धर्मेंद्र रामटेके, आयु लतिका रूपवते यांनी मते मांडली. कार्यक्रमाचे आभार आयुष्यमान राजू वासनिक यांनी मानले. या कार्यक्रमाला प्रबुद्ध संघातील बहुसंख्य सभासद उपस्थित होते.