उबेरवरील दुचाकी टॅक्सी चालकाला रिक्षाचालकाकडून मारहाण

उबेरवरील दुचाकी टॅक्सी चालकाला रिक्षाचालकाकडून मारहाण

पिंपरी : उबेर दुचाकीमुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय होत नाही, असा आरोप करत रिक्षा चालकांनी उबेरवरील दुचाकी टॅक्सी चालकास मारहाण केली. ही घटना पुनावळे येथे घडली. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंकुश कृष्णा सूर्यवंशी (२६, रा. साईनाथ कॉलनी, विनायक नगर, नवी सांगवी, मूळ रा. घाणव, ता. पाटण, जि. सातारा) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे.

तर बाबुराव शामराव पांचाळ (वय ४२), शरणबसप्पा शामराव पांचाळ (वय ३६, दोघेही रा. कोयतेवस्ती, पुनावळे), हनुमंत बिभीषण माने (वय २३, रा. पुनावळे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.