एस. एम. जोशी कॉलेजच्या साक्षी काकडे यांना रोइंग स्पर्धेत ब्राँझ मेडल

एस. एम. जोशी कॉलेजच्या साक्षी काकडे यांना रोइंग स्पर्धेत ब्राँझ मेडल 

हडपसर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन आयोजित महाराष्ट्र स्टेट मिनी ऑलिम्पिक स्पर्धा 2023 रोइंग मुलींच्या स्पर्धेमध्ये एस. एम. जोशी महाविद्यालयातील खेळाडू साक्षी काकडे यांना ब्राँझ मेडल मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन केले.

त्यांना प्रा. वासावे डी.एल. शारीरिक शिक्षण संचालक यांचे मार्गदर्शन लाभले. उपप्राचार्य प्रा. संजय जडे, उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, उपप्राचार्य डॉ. किशोर काकडे, सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.