पत्रकार संजय शिंदे यांना पितृशोक

पत्रकार संजय शिंदे यांना पितृशोक

पिंपरी : संपतराव गणपतराव शिंदे (वय ८३) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने शिराळा (जि. सांगली) येथे निधन झाले. पिंपरी चिंचवडचे जेष्ठ पत्रकार संजय शिंदे (Sanjay Shinde) यांचे ते वडील होत.

संपतराव शिंदे यांचा शिराळा येथे विविध सामाजिक, राजकीय कामात मोलाचा सहभाग होता. शिराळा तालुक्यातील विविध कारखाने, मंदिर उभारणीसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.