पूर्णानगरमध्ये आत्मनिर्भर भारत संकल्पनेतून कडधान्य दुकानाचे उद्घाटन

पूर्णानगरमध्ये आत्मनिर्भर भारत संकल्पनेतून कडधान्य दुकानाचे उद्घाटन

पिंपरी चिंचवड : सध्या आपल्या देशावरती कोरोनाचे संकट आहे, त्यामध्ये लागू लॉकडाउनमध्ये खूप लोकांच्या नोकरी, व्यवसाय संकटात आहे. त्यात आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाला आत्मनिर्भर बना असे आव्हान केले आहे. या आव्हानाला प्रतिसाद देत चिंचवडमधील पूर्णानगर येथे एका मोठया आयटी कंपनीत मध्ये कार्यरत असलेले श्रीकृष्ण काशीद यांनी स्वतःचे नवीन दुकान सुरु केले आहे.

बार्शीची ज्वारी, गहू हरभरा, मूग, मटकी असे कडधान्य दुकानात असणार आहे. या दुकानाचे उद्घाटन बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाहक विलासजी यांच्या हस्ते करण्यात आले.

नगरसेवक एकनाथ पवार, नगरसेविका योगिताताई नागरगोजे, नरेश गुप्ता, श्रीराम कुलकर्णी, शैलेश कुलकर्णी, उमेश कुटे, दिनेश फूलदेवरे, निशांत बोरसे, मंगेश पाटील आणि स्वयंसेवक आणि परिसरातील नागरिक शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

या कोरोना महामारीच्या काळात एकीकडे तरुण वर्ग हतबल झालेला असताना श्रीकृष्ण यांनी संकटाला एक संधी म्हणून पहिले आहे. तसेच या तरुण वर्गाने या संधीचा फायदा उठून आत्मनिर्भरतेच मंत्र घेऊन स्वतः व्यवसायात यावे असे आवाहन विलासजी यांनी तरुण वर्गाला केले.