एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ऊर्जा संवर्धन व नवीन संशोधन या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ऊर्जा संवर्धन व नवीन संशोधन या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न

हडपसर, (प्रतिनिधी) : ऊर्जा संवर्धन व नवीन संशोधन या विषयावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केल्यामुळे विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावर संशोधन करणाऱ्या अनेक संशोधकांशी आपली चर्चा होते. ऊर्जा व त्याचे जतन करण्यासाठी लागणाऱ्या उपकरनाबाबत जागृती होणे गरजेचे आहे. ऊर्जेचे संवर्धन झाले पाहिजे. ती काळाची गरज आहे. असे विचार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. अरविंद शाळिग्राम यांनी अध्यक्षीय भाषणात मांडले. ते एस. एम. जोशी कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक सायन्स व आय. क्यू.ए. सी. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण कोरियाचे डॉ. यंग पाक ली हे उपस्थित होते.

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ऊर्जा संवर्धन व नवीन संशोधन या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न

कार्यक्रमाचे स्वागत व परिचय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी केले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सुरतचे डॉ. निशाद देशपांडे, साऊथ कोरियाचे डॉ. संभाजी शिंदे, डॉ. नागेश मौले लंडनचे डॉ. सचिन सेंदिया यांनी मार्गदर्शन केले. उर्जेविषयी सखोल मार्गदर्शन केले.

समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रोफेसर डॉ. प्रमोद पाटील हे उपस्थित होते. ते म्हणाले की, काळाची गरज म्हणून ऊर्जा स्रोतांवर संशोधन झाले पाहिजे. आपल्या देशाची प्रगती करण्यासाठी ऊर्जा क्षेत्रात नावीन्यपूर्ण संशोधन झाले पाहिजे. ऊर्जाक्षेत्रात जगभरातील संशोधकांनी केलेले संशोधन अतिशय उपयुक्त आहे. असे ते म्हणाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्रा विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. संजय ढोले यांनी समारोप समारंभात अध्यक्षीय भाषण करताना ते म्हणाले की, अशा आंतरराष्ट्रीय वेबिनारमधून ऊर्जा क्षेत्रातील संशोधनाला चालना मिळेल. असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

पाहुण्यांचा परिचय डॉ. किशोर काकडे यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. रत्नमाला वाघमोडे यांनी केले. या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन भौतिकशास्त्र विभागप्रमुख व समन्वयक प्रा. मोहनसिंग पाडवी व संयोजक प्रा. महेश बागल, प्रा.विनोद लोहार, प्रा. हेमंत देव, प्रा. शीतल कानसकर, प्रा. जयश्री कंधारे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार उपप्राचार्य प्रा.संजय जडे यांनी मानले. या बेबिनारसाठी अनेक संशोधक अभ्यासक उपस्थित होते.