सप्तर्षी फाउंडेशनकडून सामाजिक बांधिलकी कायम | शीत ऋतु संरक्षण अभियानामार्फत गरजू व्यक्तींना मोफत ब्लँकेट वाटप

सप्तर्षी फाउंडेशनकडून सामाजिक बांधिलकी कायम | शीत ऋतु संरक्षण अभियानामार्फत गरजू व्यक्तींना मोफत ब्लँकेट वाटप
महत्त्वाच्या माहितीसाठी फॉलो करा : फेसबुक|ट्वीटर|टेलिग्राम|इंस्टाग्राम

पिंपरी : सप्तर्षी फाउंडेशन तर्फे शीत ऋतु संरक्षण अभियानामार्फत गरजू व्यक्तींना मोफत ब्लँकेट वाटप करण्यात आले. दरवर्षी आपल्या देशात शेकडो लोकांचा थंडीपासून संरक्षण न झाल्यामुळे मृत्यू होते. पिंपरी चिंचवड विभागात गरजू रस्त्यावरील व्यक्तींचे थंडीपासून संरक्षण व्हावे या भावनेने मोफत ब्लँकेट वाटप केले जाते. गेले १० वर्षापासून सदर संकल्प आणि उपक्रम अविरतपणे चालू असून हजारो ब्लँकेट आजपर्यंत वितरीत करण्यात आले.

नवनवीन व्हिडीओसाठी सब्सक्राईब करा : 👉 युट्यूब चॅनेल

या वेळी संस्थेचे सह सचिव मनोजकुमार बोरसे तसेच गोल्डन प्रिंट हाऊसच्या संचालिका अश्विनी सोनगावकर, प्रवीण सोनगावकर, आनंद उदावंत, संग्राम गोरे, बुद्धभूषण गायकवाड, मच्छिंद्र वीर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच बिजामृत लाकडी तेल घानाचे संचालक विशाल पवार, संजय चौधरी, प्रमोद देवकाते, विशाल घंदुरे यांचे सहकार्य लाभले.

सप्तर्षी फाउंडेशनकडून सामाजिक बांधिलकी कायम | शीत ऋतु संरक्षण अभियानामार्फत गरजू व्यक्तींना मोफत ब्लँकेट वाटप

मतीमंद मुलांच्या निवासी प्रकल्पात अन्नधान्य वाटप

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अनिकेत सेवाभावी संस्था संचालित मतीमंद मुलांची निवासी प्रकल्प येथे फळे व किराणा दान स्वरूप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. या वेळी संस्थेचे सह सचिव मनोजकुमार बोरसे, रूशालीताई बोरसे, श्रीविद्या बोरसे, महालक्ष्मी हार्डवेअरचे संचालक श्री. परमार यांनी विषेश सहयोग दिले.

दिव्यांग बांधवांसाठी विशेष शिबिराचे आयोजन

नुकताच दि.१२ डिसेंबर २०२१ रोजी रहाटणीतील सप्तर्षी फाउंडेशन व पिंपळे सौदागरमधील उन्नती सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे सौदागर येथे दिव्यांग बांधवांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांग बांधवाना विविध कागदपत्रे काढण्यासाठी होणारी गैरसोय कमी व्हावी व त्यांना आवश्यक दाखले व कागदपत्रे तसेच दिव्यांगांसंबधीत असणाऱ्या शासकीय व इतर योजनांची माहिती व लाभ एकाच छताखाली मिळावा याकरिता या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये त्यांना दिव्यांग दाखले (युडीआयडी) मिळण्यासाठी नोंदणी, पॅनकार्ड नोंदणी, रेल्वे सवलत नोंदणी, शासकीय शिष्यवृत्ती व अर्थसहाय्य, दिव्यांग मुलांचे व कुटुंबाचे टॅक्स सवलत व भविष्य आर्थिक नियोजन मार्गदर्शन इ. सुविधा देण्यात आल्या. या शिबिरास पिंपरी चिंचवड विभागातील जवळपास १०० दिव्यांग बांधवानी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच सप्तर्षी फाउंडेशन सोबत दिव्यांग व्यक्तींच्या पालकांनी सुद्धा स्वयंसेवक म्हणून या कार्यासाठी आपली सेवा दिली.