डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज आणि हायटेक सर्जरी विंग येथे हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

पिंपरी : डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे संचालक डॉ. भाग्यश्री पाटील आणि डॉ. पी डी पाटील यांचे सतत उत्तमात उत्तम देण्याचे स्वप्न आणि त्यासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नातून. सोमवारी (ता. २०) डॉ. डी. वाय. पाटील हाय टेक शस्त्रक्रिया विभागात ‘हृदय प्रत्यारोपण’ शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पडली. ही शस्त्रक्रिया पिंपरी चिंचवड शहरासाठी एक मानाचा तुरा ठरली.

अवयव दात्याकडून हृदय ग्रीन क्वॉरीडोअर मधून आणण्यात आले आणि त्याचे प्रत्यारोपण सर्व उच्चतम तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील हायटेक शस्त्रक्रिया विभागात करण्यात आले.

उच्चतम तंत्रज्ञानाने सुसज्ज डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज (Dr. D Y Patil Medical college) येथे इतरही अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होत असतात. शल्यचिकित्सक, भुल तज्ञ, अतिदक्षता विभाग, परफ्युजन तज्ञ, उच्च प्रशिक्षित हॉस्पिटल स्टाफ यांचा समन्वय आणि प्रयत्न यातून ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.

डॉ. अनुराग गर्ग, डॉ. स्मृती हिंदारिया, डॉ. रणजित पवार, डॉ. आशिष डोळस, डॉ. पी. एस. गर्चा, डॉ. शाबाझ हसनयन, डॉ. विपुल शर्मा, डॉ. संदीप झुंगारे, रेसिडेंट, स्टाफ यांचा या शस्त्रक्रियेत मोलाचा वाटा होता. तसेच सीईओ डॉ. अमरजित सिंघ, डीन डॉ. जितेंद्र भवाळकर, डॉ. वत्सला स्वामी, डॉ. हनुमंत चव्हाण यांचे मार्गदर्शन होते.

(शब्दांकन : डॉ. संदीप बाहेती)