आठ दिवसापासून खडकी सदार अंधारात; महावितरण कर्मच्याकडून उडवाउडवीचे उत्तर

खडकी सदार: मागील आठ दिवासापासून खडकी सदार येथील लाइट बरोबर नल्यामुळे गणपती महाल्मी या सारख्या सण अंधारत साजरे करावे लागले आहेत. यासंबंधित महावितरण कर्मचाऱ्याला सांगितले असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे गावकऱ्याचे म्हणणे आहे.

गावामध्ये जी लाइट आहे सध्या त्याने गावकऱ्याचे मोठ्या प्रणातनुकसान झाले आहे, पॅन, टिव्ही, लाइट, कुलर इलेक्टांनिक वस्तू खराब झाल्याने गावकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या गावाला वायरमन नसल्याने आठ दिवसापासून गावकऱ्यांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे.

सध्या पावसाचे दिवस असल्याने साप आणि विंचू असल्या अनेंक प्राण्यापासून जिवीत हानी होण्याची शक्यता आहे. गावात भिंती कोळसणे अनेंक घटना घडू शकता असे गावकऱ्याचे म्हणे आहे. त्या जर लाईट नसले तर अजून मनस्ताप होतोय. लकरात लवकर लाइट व्यवस्थीत करण्यात यावी.

तसेच सध्या डेंगू साथ मोठ्या प्रणात असल्याने रात्र भर डास चावत असल्याने आजारी पडणाऱ्याची संख्येत वाढत होत आहे. यावर लकरात लवकर खबरदारी घ्यावी अशी गावकऱ्याची मागणी आहे.