ज्येष्ठ कबड्डीपट्टू सुदामराव टकले यांचे निधन

ज्येष्ठ कबड्डीपट्टू सुदामराव टकले यांचे निधन

पिंपरी चिंचवड : पिंपळे निलख येथील जेष्ठ नागरिक सुदामराव (नाना) श्रीमती टकले (वय ८१) यांचे मंगळवारी (ता. २९ सप्टेंबर) अल्पशा आजाराने पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले.

टकले नाना एक उत्कृष्ट कबड्डीपट्टू होते. तसेच मुकुंद टकले व दिपक टकले तसेच सौ. विना शिवाजीराव गव्हाणे, श्रीमती उज्वला अनिल खांदवे, सौ. वैशाली राजेंद्र, सौ. शुभांगी राजेंद्र हगवणे यांचे ते वडील होत. दरम्यान, पिंपळे निलख येथील दादाघाट येथे गुरूवारी (ता. ८ ऑक्टोबर) सकाळी आठ वाजता दशक्रिया विधी होणार आहे.