Tag: ACP RR Patil

हायप्रोफाइल आयुष्य झुगारणारे तात्या | बस नाम ही काफी हैं ‘एसीपी आर. आर. पाटील’
विशेष लेख

हायप्रोफाइल आयुष्य झुगारणारे तात्या | बस नाम ही काफी हैं ‘एसीपी आर. आर. पाटील’

रोहित आठवले वलयांकित असूनही लोप्रोफाईल आयुष्य जगलेले, स्वता:ला हायप्रोफाइल न समजणारे, हायप्रोफाइल आयुष्य झुगारणारे असे पोलिस अधिकारी म्हणजे तात्या.. उपविभागीय पोलिस अधिकारी आर. आर. पाटील.. दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे सख्खे बंधू असणारे तात्या म्हणजेच राजाराम रामराव पाटील हेही आर. आर. पाटील; पण तात्या म्हणून राज्यभर परिचित आहेत. पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर तात्या आज निवृत्त होत आहेत. पोलिस खात्यात भरती होणारे आणि वयपरत्त्वे निवृत्त होणारे अधिकारी मी खूप पाहिले. मात्र, १२ वर्ष गृहमंत्री तसेच काहीकाळ उपमुख्यमंत्री असणाऱ्या आबांचा सख्खा भाऊ असूनही तात्यांनी महाराष्ट्र पोलिस दलात एक दोन नव्हे तर वीस वर्ष साईड पोस्टिंग केले. एकीकडे ग्रामपंचायत सदस्याचा किंवा आमदाराचा कार्यकर्ता नातेवाईक असल्यास आत्ताचे रिक्रूट (नवं भरती) पोलिस क्रीम पोस्टिंग पद...

Actions

Selected media actions