Tag: Anti Corruption Bureau

Pune Crime : पुणे जिल्हा परिषदेतील कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता ‘एसीबी’च्या जाळ्यात
पुणे, क्राईम

Pune Crime : पुणे जिल्हा परिषदेतील कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता ‘एसीबी’च्या जाळ्यात

पुणे, दि. १४ : जिल्हा परिषदेच्या (Pune ZP) बांधकाम विभागाकडील कामांची देयके मंजूर करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी कार्यकारी अभियंत्यासह उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यावर बंडगार्डन पोलिस (Bandgarden Police Station) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. कार्यकारी अभियंता बाबूराव कृष्णा पवार (वय ५७), उपअभियंता दत्तात्रेय भगवानराव पठारे (वय ५५) आणि कनिष्ठ अभियंता अंजली प्रमोद बगाडे अशी ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. पवार हे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात (दक्षिण) आणि अन्य दोघेजण दौंड शिरूर उपविभागात कार्यरत आहेत. ‘एसीबी’चे पोलिस उपअधीक्षक दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शासकीय ठेकेदार आहेत. त्यांना दौंड तालुक्यातील खुटबाव रस्ता ते गलांडवाडी पाणंद शिव रस्ता आणि गलांडवाडी मंदिर ते ज्...