Tag: Bhosari Police

कुप्रसिद्ध 14-12 (KR) टोळी आणि अट्टल घरफोडी चोर ‘जयड्या’च्या भोसरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या
पिंपरी चिंचवड

कुप्रसिद्ध 14-12 (KR) टोळी आणि अट्टल घरफोडी चोर ‘जयड्या’च्या भोसरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पिंपरी चिंचवड : भोसरी परीसरात कुप्रसिद्ध असलेली 14-12 (KR) किरण राठोड टोळी आणि घरफोडीत शंभरीच्या उंबरठ्यावर असलेला अट्टल घरफोड्या चोर जयवंत उर्फ ‘जयड्या’ गोवर्धन गायकवाड याच्या भोसरी पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलीसांनी त्यांच्याकडुन 200 ग्रॅम सोन्याच्या व 200 ग्रॅम चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 10 लाख 39 हजार 135 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, भोसरी परीसरात कुप्रसिद्ध असलेल्या KR टोळीचा म्होरक्या किरण गुरुनाथ राठोड ( वय- 23 वर्ष सध्या रा. साईबाबा मंदिर जवळ, दिघी, मुळगाव मु.पो. शाहपुर, ता. गुलबर्गा जि. गुलबर्गा), भगतसिंग सुरजसिंग भादा ( वय- 19 वर्ष रा. आदर्शनगर, शिव कॉलनी, गणेश मंदिर मागे, दिघी) करण राठोड आणि अभिषेक नलावडे यांनी दिघी रोड येथील एका चिकनच्या दुकानात शिरुन दुकान मालकाच्या गळ्याला ...