Tag: Breaking news

वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या प्रवाशाकडुन खंडणी उकळणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात
पुणे

वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या प्रवाशाकडुन खंडणी उकळणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

पुणे, दि.२ (लोकमराठी) - वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या प्रवाशाकडुन खंडणी उकाळणा-या टोळीला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; फिर्यादी वय वर्षे ४१ यांना रिक्षामधील चार अनोळखी आरोपींनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देवुन त्यांच्या पत्नीकडून ऑनलाईन २५,०००/- रु मागुन खंडणी उकळल्या प्रकरणी रिक्षामधील चार अनोळखी आरोपीविरोद्ध बंडगार्डन पोलीस ठाणे गु.र.नं. ४०/२०२६ न्याय संहिता कलम ३०८ (५).३ (५) अन्वये गुन्हा दाखल करून न्यायालयाने सर्व आरोपींना दिनांक ०२/०३/२०२६ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दाखल गुन्हयाचे तपासामध्ये आरोपींकडून गुन्हा करतेवेळी वापरलेली रिक्षा व गुन्ह्यातील खंडणी स्वरूपात घेतले रक्कमेपैकी १०,०००/- रुपये जप्त करण्यात आलेले आहेत. दाखल गुन्हयाचा अधिक तपास चालू आहे. गणेश आण्णा जगधने वय २९ वर्ष रा. अमयाजॉट कॅनॉल, गुलटेकडी मुण...
PUNE : लॉजमध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं, पत्रात लिहिलं कारण; पोलिस दलात खळबळ
क्राईम

PUNE : लॉजमध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं, पत्रात लिहिलं कारण; पोलिस दलात खळबळ

पुणे (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : पुण्यातून एक खळबळजनक महिती समोर आली आहे. पुण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. डेक्कनच्या एका लॉमध्ये विष प्राशन केल्याने जीवन संपवल्याचे समोर आले आहे. सांगली पोलीस दलात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाने टोकाचं निर्णय घेतल्याने पोलीस विभागात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव सूरज मराठे आहे. ते सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम करत आहे. आजरपणाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे. डेक्कनच्या लॉजमध्ये जाऊन पोलिस अधिकाऱ्याने मृत्यूला कवटाळलं आहे. महत्त्वाचे म्हणजे अवघ्या 25 व्या वर्षी पोलीस दलात सहाय्यक निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. सूरज मराठे. यांचे कुटुंब देहू येथे वास्तव्यास आहे. ते सध्या सांगली पोलीस दल...
PIMPRI : ट्रेडमार्क कायद्याचा भंग; दोघांविरोधात गुन्हा दाखल
क्राईम

PIMPRI : ट्रेडमार्क कायद्याचा भंग; दोघांविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : डिलक्स चौकातील एका हॉटेल चालकाने ट्रेडमार्क कायद्याचा भंग केला. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी शुक्रवारी (दि. २२) ट्रेडमार्क कायद्यासह इतर कलमान्वये दोघांवर गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार मार्च २०२४ पासून आतापर्यंत सुरू होता.अखिल निजामुद्दीन अन्सारी (३६ वर्ष) व सलीम निजामुद्दीन अन्सारी (४५ वर्ष, दोघेही रा. मल्हारगड, बि-१६, सेक्टर १२, मोशी प्राधिकरण) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत अमर सोमेश्वर लाड (वय ३९, अप्लाइन ओरा, बनकर वस्ती, मोशी) यांनी फिर्याद दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर लाड यांच्या हॉटेल व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या "SSV SHRI SIDDHIVINAYAK VADAPAV" या नावाचा ट्रेडमार्क हा कायदेशीर नोंदणीकृत आहे. मात्र, संशयित आरोपींनी त्यांच्या स्वतःच्या हॉटेलसाठी या नावामध्ये केवळ एका अक्षराचा बदल करून "SST SHRI SIDDHIVINAYAK VADAPAV" असे नक्कल नाव ...
Viralvideo : प्रेमाच्या त्रिकोणातून मैत्रीचा संघर्ष; दोन मुलींची तुफान हाणामारी
वायरल

Viralvideo : प्रेमाच्या त्रिकोणातून मैत्रीचा संघर्ष; दोन मुलींची तुफान हाणामारी

नवी दिल्ली – सोशल मीडियावर दोन तरुणींच्या रस्त्यावर झालेल्या वादाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दोघीही घनिष्ठ मैत्रिणी होत्या, पण त्यांच्यातील संघर्ष एका मुलावरून झाला. माहितीनुसार, या दोघींना एकाच मुलाची आवड होती. त्यापैकी एका मुलीने त्या मुलाला किस केल्याचे दुसऱ्या मैत्रिणीला समजले. या प्रकारावरून त्या दोघींमध्ये वाद झाला. विशेष म्हणजे, दुसऱ्या मैत्रिणीने त्या दोघांचा व्हिडिओ काढून तो संबंधित मुलीच्या आईला पाठवण्याची धमकी दिली. हा वाद वाढत जाऊन दोघींमध्ये रस्त्यावरच हाणामारी झाली. उपस्थितांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण दोघीही संतापाच्या भरात एकमेकींवर तुटून पडल्या. याचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, यावर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. ही घटना पाहता, नातेसंबंधांमधील गैरसमज आणि तणाव कसा वाढतो, या...
PIMPRI: दोन महिलांना मारहाण; तरुणाला अटक
क्राईम

PIMPRI: दोन महिलांना मारहाण; तरुणाला अटक

पिंपरी : एका तरुणाने घरात शिरून दोन महिलांना मारहाण केली. ही घटना चिंचवड येथील दळवीनगर येथे घडली. या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. गौरव भारत कुदळ (वय २१, रा. दळवीनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला आणि आरोपी गौरव यांचे मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाच्या कारणावरून गौरव फिर्यादी यांच्या घरात आला. त्याने फिर्यादीला शिवीगाळ केली. फिर्यादीने गौरव याला जाब विचारला असता त्याने फिर्यादीला सळईने मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांची बहीण आली असता त्यांनाही आरोपीने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले....
HOLIDAY : कामावरून साप्ताहिक सुट्टी घेणे का? गरजेचे आहे
विशेष लेख

HOLIDAY : कामावरून साप्ताहिक सुट्टी घेणे का? गरजेचे आहे

आजच्या ताणतणावपूर्ण आणि धावपळीच्या जीवनात कामावरून साप्ताहिक सुट्टी घेणं अत्यंत आवश्यक आहे. जगभरातील अनेक संस्कृतींमध्ये कामाच्या विश्रांतीला महत्त्व दिलं जातं, कारण मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने साप्ताहिक सुट्टी घेणं खूप फायदेशीर असू शकतं. विविध कारणांमुळे साप्ताहिक सुट्टी महत्त्वाची आहे, आणि त्याचं महत्व समजून घेतल्यास आपल्या कामकाजातील कार्यक्षमता आणि जीवनातील आनंद वाढवता येतो. १. मानसिक विश्रांती आणि ताण कमी करणे साप्ताहिक सुट्टी घेतल्याने मानसिक विश्रांती मिळते. सतत काम करणं हे मानसिक ताण, थकवा आणि चिंतेला वाढवू शकतं. सुट्टी घेतल्याने कामाचा दबाव कमी होतो आणि मेंदूला आराम मिळतो. या विश्रांतीमुळे आपण नव्या उत्साहाने कामावर परत येऊ शकतो. ताणामुळे होणारी मानसिक धकधक, नैराश्य किंवा कामावरून सुट्टी न घेतल्याने होणारी बर्नआऊट परिस्थिती टाळली जाऊ शकते. २. शारीरिक...
Cyclostyle : सायक्लोस्टाईल केलेल्या प्रश्नपत्रिका पूर्वी शाळेत दिल्या जायच्या; काय होते हे तंत्र
विशेष लेख

Cyclostyle : सायक्लोस्टाईल केलेल्या प्रश्नपत्रिका पूर्वी शाळेत दिल्या जायच्या; काय होते हे तंत्र

विलास स्वादी१ - स्टेनसिल - हां एक फूलसकेप आकाराचा टिश्यू पेपर सारखा स्क्रीन असे. या वर स्टेनसिल पेन वापरून मजकूर लिहिला जायचा किवां टाइपराइटर / टंक लिखित केला जायचा. स्क्रीन वर टंक लेखन करण्या साठी - टाइपराइटर मधील रिबन काढून ठेवावी लागे. मग नेहमी प्रमाणे टंकखन करत. या प्रकारात अक्षर सरळ स्क्रीन वरच उमटावाली जात. अक्षराच्या वळणा प्रमाणे स्क्रीन वर ठसा उमटला जाई. टाइपराइटर कीती जोराने बड़वायाचा याचे भान राखावे लागे. अक्षर चुकीचे उमटवल्यास चूक सुधारण्या साठी लाल रंगाचे सोलुशन ब्रश ने चुकीच्या अक्षरावर हल्केच लावावे लागे. हे सोलुशन ठसा भरून टाके. नंतर त्याच जागेवर योग्य अक्षर हळू वार पणे उमटावे लागे. एकन्दर टंक लेखन कौशल्याचा कस लागेल असे ते काम होते. ज्याना ते जमे ते ऑफिस मधे रुबाब दाखवत. यात घाई गड़बडीत एखाद दुसरी ओळ दुसऱ्या पानावर घ्यावी लागे. काही वरिष्ठ या वरुन शेरेबाजी करतच. ...
CHINCHWAD : रस्तप दुभाजकाला धडकून दुचाकीस्वार ठार
ताज्या घडामोडी

CHINCHWAD : रस्तप दुभाजकाला धडकून दुचाकीस्वार ठार

पिंपरी : रस्ता दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात चिंचवडमधील गरवारे कंपनीजवळ घडला. नयन संजयकुमार इंगळे (वय २३, रा. ऋतुजा हाउसिंग सोसायटी, महात्मा फुलेनगर, चिंचवड) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. इंगळे हे दुचाकीवरून जात असताना गरवारे कंपनीजवळील चौकातील रस्ता दुभाजकाला आणि खांबाला दुचाकी बसली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने नयन यांचा मृत्यू झाला....
PIMPRI CHANCHWAD : उताऱ्यात नोंद लावण्यासाठी चार लाखांची लाच; मंडलाधिकारी अटकेत
ताज्या घडामोडी, पिंपरी चिंचवड

PIMPRI CHANCHWAD : उताऱ्यात नोंद लावण्यासाठी चार लाखांची लाच; मंडलाधिकारी अटकेत

पिंपरी : बंगल्याची सातबारा उताऱ्यात नोंद करण्यासाठी चार लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलेल्या मंडलाधिकाऱ्याला विशेष न्यायालयाने ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. (Pune) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. ४) चिंचवड येथील मंडलाधिकारी कार्यालयात ही कारवाई केली. सुरेंद्र साहेबराव जाधव (५६) असे अटक केलेल्या मंडलाधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी वाल्हेकरवाडी येथील एका ५३ वर्षीय व्यक्तीने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने वाल्हेकरवाडी येथे सहा गुंठे जागा घेऊन बंगल्याचे बांधकाम केले होते. या बंगल्याची सातबारा उताऱ्यात नोंद करण्यासाठी मंडलाधिकारी सुरेंद्र जाधव यांनी पाच लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर लाच ४ लाख ५० हजार रुपयांपर्यंत आली. दरम्यान, मंगळवारी (दि. ४) मंडला...
PIMPRI:पत्नीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरू नये म्हणून पतीने रचला बनाव…
क्राईम

PIMPRI:पत्नीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरू नये म्हणून पतीने रचला बनाव…

पिंपरी :- मुलीच्या मृत्यूला पत्नीला जबाबदार धरून पतीने तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येचे खरे कारण बाहेर येऊ नये, आपल्यावर गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी पतीने स्वतःच मृत पत्नीच्या नावाने खोटी चिठ्ठी लिहिल्याची घटना २५ फेब्रुवारीला पिंपळे सौदागर येथे उघडकीस आली. हिमांशू दिनेश जैन (३५, रा. सौदागर) या संगणक अभियंता पतीवर सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या ३२ वर्षीय विवाहितेच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हिमांशू हा संगणक अभियंता असून आत्महत्या केलेली विवाहिता गृहिणी होती. हिमांशू याचे एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते, त्यावरून पती-पत्नीत सतत वाद होत होते. दरम्यान, त्यांच्या एक वर्षीच्या मुलीचे २७ फेब्रुवारी २०२४ रो...