मुख्यमंत्री सहायता निधीत कोरोनासाठी भरभरून मदत, पण कॅन्सरचे रुग्ण मात्र मदतीविना मरणाच्या रांगेत !
महेंद्र अशोक पंडागळे
मागच्या वेळी केरळमध्ये आलेल्या पुराला मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाने (देवेंद्र फडणवीस यांनी ) 200 कोटी रुपये दिले होते, असे म्हणतात माहीत नाही. पण तेंव्हापासूनच या निधी कक्षाला काय झालंय काही कळत नाहीये. गेली वर्षभरात कॅन्सर, किडनी आणि हृदयरोगाचे रुग्ण ज्या स्पीडने वाढत आहेत, तरुण लहान मुले पटापट मृत्युमुखी पडत असताना राज्याच्या खात्यातून आणि इतर कोणत्याही ट्रस्टकडून हवी तशी काहीही मदत मिळताना दिसत नाहीये. इतकंच काय तर Tata Trust सारखी इतकी मोठी ट्रस्ट सुद्धा कमी पडायला लागली आहे, अशी भयानक परिस्थितीत आज महाराष्ट्र राज्य आहे.
नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारने 2014 ला सत्तेत आल्यापासून सामान्य माणसाच्या विकासासाठी काम करणाऱ्या Ngo आणि Trust यांचा FCRA बंद करून बाहेरून येणारी हजारो कोटींची मदत रोखून धरली आणि त्यामुळेच राज्यात 12AA, 80G आणि FCRA असलेल्या हजारो सामाजिक...