Tag: Chandrakant Patil

हल्ला केला म्हणून सोमय्या गप्प बसणार नाहीत, जशास तसे उत्तर देऊ; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला इशारा
पुणे, राजकारण

हल्ला केला म्हणून सोमय्या गप्प बसणार नाहीत, जशास तसे उत्तर देऊ; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला इशारा

पुणे : हल्ला केला म्हणून किरीट सोमय्या स्वस्थ बसणार नाहीत, भारतीय जनता पार्टी कायदेशीर पद्धतीने जशास तसे उत्तर देईल, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिला. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील बोलत होते. ते म्हणाले की, सभ्यतेचा पांघरलेला बुरखा आता फाटला असून सर्व ठिकाणी राज्यातील सत्ताधाऱ्यांचा मूळ चेहरा दिसू लागला आहे. मुद्दे संपल्यामुळे ते गुद्द्यांवर आले आहेत. भावना गवळी यांच्या प्रकरणात यवतमाळमध्ये किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला करण्यात आला म्हणून ते घाबरून घरी बसले नाहीत. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रकरणात तर किरीट सोमय्या यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानीच स्थानबद्ध करायचा प्रयत्न झाला पण त्यामुळे ते घाबरून घरी बसले नाहीत. आजच्या शिवसैन...

Actions

Selected media actions